तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

शिक्षण क्षेत्रात फिनिक्स पब्लिक स्कुल उंच भरारी घेईल-डॉ.संतोष मुंडे फिनिक्स पब्लिक स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
अगदी लहान वयातील मुलांच्या हाती पालक मोबाईल देत आहेत.बालकांना सोशल मिडीयावरीईल बर्या-वाईट घटनांचे ज्ञान नसल्याने व्हॉटस् अप,फेस बुक सारख्या सोशल मिडीयावर तासन् तास वेळ घालवतात मोबाईलच्या या अति वापराने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होवुन गुणवत्ता ढासाळत चालल्याने पालकांनी याची काळजी घेण्याचे आवाहन केले.  तसेच शिक्षण क्षेत्रात फिनिक्स पब्लिक स्कुल उंच भरारी घेईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अपंगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांनी केले.या कार्यक्रमास युवा नेते रामेश्वर मुंडे, ग्रामीण पोलिस निरीक्षक शिवलाल पुर्भे, शिक्षण विस्ताराधिकारी अन्सारी मॅडम , जिजामाता कौलेज चे प्राचार्य गित्ते सर, बालाजी गुट्टे सर, बोडके साहेब, बाळासाहेब गुट्टे, इंद्रजित शिरसाठ , युवा नेते अँड.प्रकाश मुंडे, पोलिस कर्मचारी बोडके व कार्यक्रमाचे अध्यक्ष गँगधर फड, देवनाथ दहिफळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष माधव मुंडे यांनी केले. धर्मापुरी येथील फिनिक्स पब्लिक स्कुलच्या प्रथम वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन डॉ.मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. धर्मापुरी येथील फिनिक्स पब्लिक स्कुलचे वार्षिक वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.चिमुकल्यांनी नव्या,जुन्या गाण्यावर नृत्यकला सादर करताना देशभक्ती, आईवर, पपोअवर, गोंधळी गीत,बंजारा गीत व पॉप रिमिक्स आदीप्रकारच्या गाण्यावर कलेचे दर्शन घडवलेल्या या शाळेच्या वार्षिंक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सामाजीक कार्यकर्ते डॉ संतोष मुंडे याच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथींचे स्वागत स्कुलचे संचालक माधव मुंडे व पालकाच्या हस्ते शिक्षकांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपटे देवुन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे यांनी बालमनावर सोशल मिडीयाचा होत असलेला दुष्परीनाम सांगताना आजकाल अनेक पालक आपल्या बाळास बोलने,चालणे शिकवण्याऐवजी मोबाईल हातात देत आहेत. इंटरनेटमुळे जगातील सर्व माहिती उपलब्ध होत असली तरी लहान मुलांना याचे ज्ञान नसल्याने ही मुले व्हॉटस् अप,फेसबुक व गेम्स खेळण्यात अधिक वेळ घालवताना दिसतात यामुळे या सोशल मिडीयातील वाईट बाबींचा बालमनावर विपरीत परिणाम होवुन याचा शैक्षणीक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने आपल्या मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केले.यावेळी मान्यवरांनी फिनिक्स पब्लिक स्कुलने संचालक माधव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देवुन एकाच वर्षात गुणवत्ता सिध्द केल्याने या शाळेत शिकलेले विद्यार्थी भविष्यात मोठ्या पदावर काम करताना पहावयास मिळतील असा विश्वास व्यक्त केला.यावेळी ज्ञानेश्वरी मॅडम ,प्राचार्य रणबावरे मॅडम, करुणा मॅडम, सुनीता मॅडम, अजय गित्ते राम गुट्टे, गणेश गित्ते,लखन गुट्टे सचिन शिरसाठ आदींनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment