तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

'निम्न दुधना' तून होतोय बेकायदेशीर पाणी उपसा !कारवाईची दबाव गटाची मागणी


सेलू जि.परभणी, दि.६ ( प्रतिनिधी )  : निम्न दुधना धरणातून सध्या बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा सुरू आहे.उन्हाळा तोंडावर आला आहे.भविष्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता तातडीने पाण्याचा उपसा थांबविण्याची तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दबाव गटाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावर्षी मोजका व अपुरा पाऊस झाल्याने निम्न दुधना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यातच धरणाच्या मागील बाजूने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे रात्रंदिवस पाण्याचा उपसा सुरू आहे.त्यावर संबंधित विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
सदरील धरणाच्या पाण्यावर सेलू,मंठा,परतूर व इतर परिसरातील शेकडो खेड्यांचा पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे.याचं प्रकारे जर सतत बेकायदेशीर पाणी उपसा चालू राहिला तर ऐन उन्हाळ्यात शेकडो गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.त्याच प्रमाणे जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूप धारण करेल.या धरणातून बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असताना याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.गेल्यावर्षी जर पाऊस पडला नसता तर याच वर्षी असंख्य गावे पाण्यावाचून होरपळून गेली असती.कारण मृत साठ्यापेक्षाही कमी पाणीपातळी मागील वर्षी झाली होती.गेल्या तीन ते चार वर्षांपासून पाऊस कमी पडल्याने भीषण दुष्काळ समोर होता.परंतु सध्या धरणात पाणी आहे पण बेकायदेशीर उपसा सुरू आहे.यामुळे भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागू शकते.म्हणून निम्न दुधना धरणातून मागील बाजूने होणारा बेकायदेशीर पाणी उपसा तातडीने बंद करण्याची मागणी दबाव गटाने केली आहे.या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक ॲड.श्रीकांत वाईकर,ॲड.शिवाजी चौरे,ओमप्रकाश चव्हाळ, ॲड.देवराव दळवे,गुलाबराव पौळ,विलासराव रोडगे,इसाक पटेल,राजेंद्र केवारे,बालासाहेब पौळ,लक्ष्मण प्रधान,मधुकरराव सोळंके,रामचंद्र कांबळे,मुकुंद टेकाळे,सतीश काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वार्तांकन :बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a Comment