तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

ग्रामपंचायतीचा सार्वत्रि‍क निवडणूक कार्यक्रम जाहीर


बुलडाणा, दि. 26 :   राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये एप्रिल ते जुन 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रि‍क  निवडणूकीचा संगणकीय कार्यक्रम घोषित केला आहे. 

           जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील  भिंगारा ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :  तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्या दिनांक 27 फेब्रुवारी 2020, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी दि. 6 मार्च 2020  ते दि. 13 मार्च 2020 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत,  दि. 8 मार्च 2020 चा रविवार व दि. 10 मार्च 2020 ची सुट्टी वगळून, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक 16 मार्च 2020 वेळ सकाळी 11 वाजतापासुन छाननी संपेपर्यत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2020 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत, निवडणूक चिन्ह नेमुन देण्याचा अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 मार्च 2020 दुपारी 3 वाजेपर्यत, आवश्यक असल्यास मतदान दि. 29 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यत, मतमोजणीचा (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील) दिनांक 30 मार्च 2020, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि. 4 एप्रिल 2020 पर्यत राहील. निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यत आचारसंहिता लागु राहील याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी  घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने  प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment