तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने शनीमंदिर जिर्णोध्दारासाठी ६ लाख ११ हजार रुपयांची मदत
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
             येथील शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेच्या वतीने वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनिमंदिर च्या जिर्णोध्दारासाठी ६ लाख ११ हजाराची आर्थिक मदत देणगी स्वरूपात देण्यात आली.
                शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेच्या वतीने ७ एप्रिल२०१९ मध्ये राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील काही रक्कम जमा झालेली होती. येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिराचा जिर्णोध्दार गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने ही शिल्लक रक्कम ६ लाख ११ हजार रुपये या जिर्णोध्दारासाठी शनीमंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शिला लांडगे, चंद्रकांत उदगीरकर यांना देण्यात आली. यावेळी शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटना, वधूवर परिचय मेळावा समितीचे अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment