तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

पत्रकार संरक्षण समिती पाथरीच्या अध्यक्षपदी शेख सिकंदर,उपाध्यक्ष पदी मो.खुर्शीद शेख

प्रतिनिधी
पाथरी:- येथील  पञकार संरक्षण समितीची बैठक  शासकिय विश्राम गृह पाथरी येथे सोमवार ३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.पत्रकार संरक्षण समिती पाथरी २०१९ कार्यकारिणीचा  कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने नवीन कार्यकारिनी जाहीर करण्यात आली.
या वेळी तालुका अध्यक्ष पदी शेख सिंकदर शेख हाफिज  तर उपाध्यक्ष पदी मो. खुर्शीद मो.शफी शेख यांची निवड करण्यात आली. पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्र  यांच्या सूचने नुसार  परभणी जिल्हाध्यक्ष अहमद अन्सारी व जिल्हा सचिव शेख अजहर यांच्या अध्यक्षते खाली सर्वानुमते ही निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष शेख नदीम शेख रशीद तांबोळी यांनी आपल्या पदाची जबाबदारी नवनिर्वाचित अध्यक्ष शेख सिकंदर यांच्या कडे सोपवली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष शेख आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, समितीच्या ध्येय धोरणाला एकनिष्ठ राहून शासना च्या दरबारी पत्रकारांच्या समस्या मांडून न्याय  मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. अशी ग्वाही  नवनिर्वाचित अध्यक्ष शेख यांनी दिली.यावेळी पञकार संरक्षण समीतीचे सर्व सभासद व पदाधिकार उपस्थित होते . या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment