तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

केंद्र सरकारने गॅस सिलिंडर दरवाढ करण्याचा विरोधात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची जिल्हाधिकारी कार्यलयसमोर निदर्शनेबीड (प्रतिनिधी)  :-स्वयंपाकासाठी लागणारा गॅस हा प्रत्येकाच्या घरातील अत्यावश्यक बाब आहे.परंतु मागील सहा महिन्यापासून मोदी सरकार महिन्याच्या एक तारखेला सतत सिलेंडर गॅसची दरवाढ करून सामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम करत असून याला विरोध करण्यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.राजकिशोर मोदी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. 

एक सप्टेंबर पासून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नियमीत घरगुती गॅसची दरवाढ केली जात आहे. ही दरवाढ १0 रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत केली जात होती. मात्र यावेळेस पहिल्यांदाच घरगुती गॅसची दरवाढ एकवेळस १४५ रूपायानी केली व ती पण एक तारखेला न करता दिल्लीच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 1३ फेब्रुवारीला करण्यात आली असून हा जनतेच्या भावनेची  एक प्रकारे क्रूर चेष्टा केली जात आहे. माता-भगीनींच्या डोळ्यातील अश्रू बंद करण्यासाठी मोदी सरकार गॅस देत असल्याचे सांगत असताना साडे चारशे रुपयाचा गॅस ९२० रुपये पर्यंत दरवाढ करून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम हे सरकार करत आहे.याचा निषेध बीड जिल्हा काँग्रेस कमिटी करत असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी निदर्शने करून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अॅड. कृष्णा पंडित, वचिष्ट बडे,अॅड राहुल साळवे,योगेश शिंदे, श्रीनिवास बेद्रे, डॉ इद्रीश हाश्मी,गोविंद साठे, नागेश मिटे पाटील, कांबळे कडूदास,प्रितेश दायमा,संतोष निकाळजे,शामसुंदर जाधव,जयदीप राऊत,परवेज कुरेशी,किरण अजबकर,बाबासाहेब झोडगे,सफदर देशमुख,शामसुंदर जाधव, इम्तिहाज कुरेशी,भारत वालेकर,राजेभाउ बडे, शिवराजे शिरसाट, सौरभ भागवत, शेख इफरोज,जयप्रकाश आघाव,बळीराम गिराम, योगेश बोबडे,महेश जाधव,जीजा संगीता साबळे,कौशल्या जाधव जगताप,स्वप्नील चौरे व काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment