तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

सी.ए.ए.,एन.पी.आर.,एन.आर.सी. कायद्याच्या विरोधात परळीत २०३ जणांचे सामूहिक मुंडनपरळी (प्रतिनिधी)  :  संविधान संरक्षण समिती परळी च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाच्या ३२ व्या दिवशी दि.२६ फेब्रुवारी २०२० रोजी परळी येथील संविधान संरक्षण भूमी तळ या ठिकाणी सायंकाळच्या सत्रात सी.ए.ए.,एन.पी.आर.,एन.आर.सी. कायदा व दिल्ली येथील झालेल्या जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ परळी येथे २०३ युवकांनी तोंडावर काळ्या फिती लावून सामूहिक मुंडन केले. संविधान संरक्षण समिती परळी चे अध्यक्ष पी.एस.घाडगे, मुफ्ती अश्फाक, अनंत इंगळे, फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, जी.एस. सौंदळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सांस्कृतिक कार्यवाहक मनोहर जायभाय यांनी या आंदोलनात सोबत असल्याचे सांगितले. यावेळी अनिस चे बीड जिल्हा अध्यक्ष प्रदीप चव्हाण, प्रा.विलास रोडे, शौकत पठाण, विकास वाघमारे तसेच राजा खान, हाजी बाबा, लाला खान, शेख शमू, नगर सेवक शेख शरीफ, उमर बागवान आदींची उपस्थिती होती. यावेळी इंजि.भगवान साकसमुद्रे म्हणाले की, भारताचे संविधान व लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी जे-जे करावे लागेल ते-ते करण्याची सर्वांनी तयारी ठेवावी. दिल्लीत घडवून आणलेल्या जातीय हिंसाचाराच्या विरोधात आम्ही लोकशाही मार्गाने भारतीय संविधान कलम १९(ब) च्या मूलभूत अधिकाराअंतर्गत प्रत्येक नागरिकाला शांततेत एकत्रित येऊन विरोध करण्याचा अधिकार आहे. वर्तमान काळात NPR(एन.पी.आर.) व जनगणना हे एक नसून वेग-वेगळे आहेत. आपल्या देशात सन १८८१ पासून २०१० पर्यंत दर १० वर्षाला जनगणना होते. परंतु (सी.ए.ए.)CAA २००३ नियमांतर्गत पहिल्यांदा २०१० मध्ये जनगणना व NPR (एन.पी.आर.) एकत्रित केला गेला. NPR(एन.पी.आर.) हि NRC(एन.आर.सी.)  आणि NIRC ची पहिली पायरी आहे. NPR(एन.पी.आर.) च्या संकलित माहितीचा वापर केवळ आणि केवळ NRC (एन.आर.सी.) साठीच होतो. म्हणून NPR(एन.पी.आर.) मधील वडिलांचा व आजोबांचा जन्म तारीख आणि जन्म ठिकाण च्या माहितीचा उपयोग देशाला नाही. हे केवळ प्रत्येक नागरिकाला नाहक त्रास देऊन हतबल करण्याचा प्रयत्न आहे. या काळ्या, त्रासदायक व अनावश्यक कायद्याच्या विरोधात जनआंदोलन मोठ्याप्रमाणात उभे करून संविधान विरोधी (सी.ए.ए.)CAA २००३, सी.ए.ए.२०१९, एन.पी.आर., एन.आर.सी. कायदा रद्द करण्यास जनरेठ्याने भाग पाडु असे यावेळी ते म्हणाले. परळी येथे २०३ युवकांनी केलेल्या सामूहिक मुंडनात इमरान खान, तहसीन नवाब, सय्यद अझहर, एजाज मौजान, शेख अजीम, सलीम राज, तखीं खान, मरसलींन खान, असलम राज, शेख अश्फाक, ए.पी.रज्जाक, फैसल कुरेशी, सैय्यद समीर यांच्या सह २०३ जणांनी सामूहिकरीत्या मुंडन केले.

No comments:

Post a Comment