तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा प्रश्नी


पुनर्निरिक्षण करण्याचे निर्देश

-डॉ. नितीन राऊत

मुंबई, दि. 6 : मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा संदर्भात महावितरणने शासकीय जागेच्याबाबत पुनर्निरिक्षण करुन अहवाल द्यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.         

मोर मध्यम सौरऊर्जा प्रकल्प शासकीय जमिनीवर उभारण्यात यावा ही बाब महावितरणच्या विचाराधीन होती. तथापि त्या ठिकाणी निकषात बसणारी जागा नसल्याने हा प्रकल्प आतापर्यंत होऊ शकला नाही. त्या संदर्भात आ. शिरीष चौधरी यांनी व महावितरणने जागेचे पुनर्निरिक्षण करावे,  अशी मागणी केली होती. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आ. शिरीष मधुकरराव चौधरी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक महावितरण असिमकुमार गुप्ता तसेच पाटबधारे व जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.   
सामान्य वीज ग्राहकांना कमीत कमी दरात
वीज देण्यासाठी शासन सदैव सकारात्मक
-डॉ.नितीन राऊत
(मुंबई प्रतिनिधी :अनुज केसरकर)
मुंबई,दि. 6 : सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या समवेत झालेल्या वीज दर प्रश्नासंदर्भातील बैठकीत तेबोलत होते.         
वीजदर संदर्भात एमईआरसीकडे प्रस्ताव आला असून त्यासाठी जनसुनावण्या घेण्यात येतील. त्यामध्ये महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेला देखील आपले म्हणणे मांडता येईल तसे त्यांनी मांडावे. त्यानंतर एमईआरसी निर्णय घेईल. तो निर्णय शासनाकडे येईल. त्याबाबत शासन योग्य तो पुढील निर्णय घेईल. जो सामान्य वीज ग्राहकाच्या हिताचाअसेल असे मंत्री महोदयांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.         
संघटनेच्या वतीने शेतीपंप, वीज बीले, वीज दर व कृषी संजीवणी योजना तसेच औद्योगिक वीज ग्राहकांचे वीज दर, स्पर्धात्मक पातळीवर आणणेबाबत उपाययोजना करणे, नवीन वीज दर वाढ प्रस्तावास स्थगिती देणेबाबत निवेदन देण्यात आले.         
यावेळी कोल्हापूरचे आ. चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे व इतर पदाधिकारी तसेच ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक महावितरण असिमकुमार गुप्ता व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment