तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

मा.विश्वासराव कडु पा.यांचा जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने सत्कार
सात्रळ /प्रतिनिधी

    राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील जगातील पहिला सहकारी साखर कारखाना  असलेला पद्मश्री डाॅ विठ्ठलराव विखे पा.सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथील सन २०२० ते २०२१ ची संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. यावेळी मा.विश्वास राव कडु पा यांची बिनविरोध निवड झाली.
  याप्रसंगी मा.विश्वास राव कडु पा.यांच्या सात्रळ येथील निवासस्थानी जागतिक संविधान व संसदीय संघ अर्थात ( वर्ड काॅन्स्टीट्युशन अॅड पार्लमेंट. असोसिएशन चे श्रीरामपुर चॅप्टर चे तसेच युनायटेड नेशन पुल चे सदस्य  मा.दत्ताजी विघावे सर यांच्या मार्गदर्शनाने व श्रीरामपुर चॅप्टरचे सहसचिव व सदस्य मा.बाबासाहेब वाघचौरे यांच्या शुभहस्ते व मा.चांगदेव पलघडमल यांच्या समवेत मा.विश्वास राव कडु पा.यांचा हार, पुष्प, गुच्छ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
 त्याच बरोबर पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment