तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

प्रा.पी.एस.आठवले धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित


औरंगाबाद (प्रतिनिधी) :- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इंग्रजी विभागाचे संशोधक प्रा.पी.एस.आठवले यांना धम्मभूमी मासिक पत्रिकेच्या धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रा.आठवले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील लोकप्रिय असलेले धम्मभूमी मासिकाचे मुख्य संपादक  विजय डांगे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच प्रा. आठवले यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे नेहरू महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि प्रोटॉन संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत,धम्मभूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रा.आठवले यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे,तसेच प्रा.डॉ.उत्तम अंभोरे, प्रा.डॉ. आनंद उबाळे,शहादेव आठवले, गौकर्णा आठवले,रामेश्वर वानखडे,सुभाष इंगळे, अजय अंदूरकर,तेजराव इंगळे इंगळे, प्राजक्ता आठवले,सतीश दवणे, ऍड. विजय सुरडकर डॉ. प्रवीण बनसोड व डॉ. मिलिंद आठवले यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment