तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

नवजात शिवकन्येच्या मातेला पोलिसांनी घेतले ताब्यात ; परळीत संभाजी नगर डी बी पथकाने केली प्रयत्नांची शर्थ; संवेदनशील प्रकरणाचा विक्रमी १८ तासांत लावला छडा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथे दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री एक स्त्री जातीचे नवजात अर्भक काट्याकुट्यात आढळून आले होते. या प्रकरणी रात्रीच संभाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले. त्यांनंतर डी. बी. पथकाचे प्रमुख रमेश सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करत विक्रमी १८ तासांत १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील पोलीस कारवाई सुरू आहे.

दरम्यान घटनेची माहिती कळताच बाळाचे  पालकत्व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे व खा. सुप्रियाताई सुळे यांनी नवजात अर्भकाचे पालकत्व स्वीकारले. शिवकन्येवर येथील रांदड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कालच्यापेक्षा बाळाच्या प्रकृतीत आज सुधारणा आहे असे डॉ. विजय रांदड यांनी सांगितले.

या संवेदनशील प्रकरणी संभाजीनगर डी. बी. पथक प्रमुख रमेश सिरसाट, दत्तात्रय गित्ते, सचिन सानप आदी कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवारांच्या मार्गदर्शनाखाली खाकीतील माणसाचे स्तुत्य दर्शन घडवले. त्यामुळे सर्वांचे चहूकडे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment