तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

गेवराईतील किंगसन ग्लोबल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ६ _ आयोजित करण्यात आलेल्या किंगसन ग्लोबल स्कूल या शाळेच्या चौथ्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ महासाहेब आणि आजच्या युगातील आद्य सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. दरम्यान शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
         यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गेवराई पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक कार्यारंभचे उपसंपादक गणेशजी सावंत, वैद्यकीय अधिकारी बालाजी फलके, दैनिक रिपोर्टरचे तालुका प्रतिनिधी भागवतराव जाधव, गेवराई तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मधुकरराव तौर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक सचिनरावजी मोटे, मधुकर आर्दड, स्कूलच्या संचालिका वेदिका चाळक तसेच संचालक श्री. शाम चाळक सर यांची उपस्थिती होती. यावेळी महिला दिनानिमित्त शाळेमध्ये पालक महिलांसाठी घेतलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेचे संचालक श्री. शाम चाळक सरांनी शाळेच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल वाचून दाखवला. गेवराई शहरात किफायतशीर खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी किंगसन ग्लोबल स्कूल नेहमी तत्पर राहील असे आवाहन पालकांना केले. शाळेमध्ये आता इयत्ता पहिली ते आठवी सीबीएससी बोर्डाची मान्यता मिळाल्याची माहिती पालकांना दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दैनिक कार्यारंभचे उपसंपादक गणेश सावंत म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्यांना फक्त शिक्षित न करता त्यांना सुसंस्कृत केले पाहिजे, उद्याच्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त शिक्षण महत्त्वाचे नसून आपल्या पाल्यांना सुसंस्कारित माणूस म्हणून तयार करण्याचे काम पालकांनी व शाळेत करावे असे विचार  गणेश सावंत यांनी मांडले. यावेळी बोलताना त्यांनी पुराणातील अनेक समर्पक दाखले देऊन पालकांचे डोळे उघडण्याचे काम केले. बालक, पालक व शिक्षक या त्रिसूत्री नातेसंबंधावर त्यांनी प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे गेवराई शहरांमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचे काम किंगसन ग्लोबल स्कूलचे संचालक श्री. शाम चाळक व वेदिका चाळक मॅडम हे तत्व निष्ठेने करत असल्याचे सांगितले.
        या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी मल्हार वारी, पोवाडा, दांडिया गीत, छोटी सी नन्ही, टुकूर टुकूर, धडक धडक, कृष्ण जन्मला, देशभक्ती, पारंपारिक गीते लावण्या, विठ्ठल नामाचा गजर अशा विविध प्रकारच्या गीतांचा उपस्थित पालकांची दाद मिळवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस निवेदीता व वेदिका मॅडम यांनी केले व शेवटी आभार दुर्गा पारिक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment