तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

प्रदूषणाच्या विळख्यातून परळीला मुक्त करा-व्यंकटेश शिंदे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, पालकमंत्री यांची याविषयी भेट घेणार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरा लगत सिमेंट फॅक्टरी, थर्मल पावर स्टेशन, तसेच अवैद्य वीट भट्टी व अवैध रखेची वाहतूक यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली असून यामुळे राख, माती यांचा प्रादुर्भाव हवेमध्ये मोठ्या प्रमाणात मिसळला असून यावर त्वरित निर्बंध आणणे गरजेच आहे व परळी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरलेल्या प्रदूषणाच्या विळख्यातून परळीला मुक्त करा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, व पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांची ची भेट घेऊन यावर उपाययोजना करण्यासाठी मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे

 शहरात व ग्रामीण भागात होणाऱ्या राखेच्या व इतर प्रदूषणामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून सर्व पाहून डोळेझाक करणाऱ्या प्रशासनांमुळे नागरिकांना त्वचारोग, डोळ्यांचे आजार, फुफ्फुसांचे आजार, अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे यामुळे शहरातील व तालुक्यातील हजारो लोकांना श्वसनाचे व विविध आजार जडले असून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या विविध प्रदूषण पसरवणाऱ्या थर्मल पावर स्टेशन, सिमेंट कंपनी, वीटभट्ट्या व अवैधरित्या होणारी राखीची वाहतूक प्रशासनाने त्वरित थांबवावी व परळीला प्रदूषण मुक्त करावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केली आहे तसेच वरील विषयावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, पालकमंत्री यांना भेटून प्रदूषणाचा विषयावर निवेदन देणार असून जर लवकरात लवकर या सर्व विषयी उपाय योजना झाली नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा प्रशासनाला या पत्रकाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment