तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

संप्रदायातील काला दुर्मिळ असतो, देवादिकांना सुद्धा काल्याचा प्रसाद मिळत नाही-ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
संप्रदायातील कुठलाही कार्यक्रम काल्याशिवाय पूर्ण होत नाही, संप्रदायात काल्याचा प्रसाद सर्वश्रेष्ठ आहे. काला सोपा नाही, भगवंतांच्या वैकुंठात सुद्धा काला मिळत नाही, नामाचे दही व प्रेमाची लाही म्हणजे नाम प्रेमाचा काला. वारकरी संप्रदायात शब्दाला महत्व नसते पण तो शब्द कोण उच्चारतो यावर त्या शब्दाचे महत्व ठरत असते असे प्रतिपादन ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांनी केले.
परळी तालुक्यातील दाऊतपुर येथे 14 फेब्रुवारीपासून वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह व रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांची श्रीराम कथा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थीतीत संपन्न झाली. आज ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यावर सप्ताहाची संागता झाली.
काल्याच्या किर्तनास अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह नामदेवराव अघाव, ऍड.दत्ता आंधळे, एम.टी. देशमुख, शिवरत्न मुंडे, डॉ.संभाजी मुंडे, पांडुरंग सोनी, प्रकाश सामत, डॉ.राजाराम मुंुडे, पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, ह.भ.प.विश्वास महाराज पांडे, संतोष जुजगर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment