तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

लावण्याई पब्लिक स्कुलचे मंगळवारी वार्षीक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा कुस्ती परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते उद्घाटनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- इंडिस्ट्रीज ऐरिया येथील  लावण्याई पब्लिक स्कुलचे या शाळेचे दि.18 फेब्रुवारी रोजी लहान बालकांच्या उत्साह व त्यांच्या कला गुणांचा मधूर संगम म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा आयोजित केले असुन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संमेलनास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लावण्याई पब्लिक स्कुलचे अध्यक्ष मधूकर गिरवलकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांची प्रमुख उपस्थितीत लाभणार आहे. अध्यक्षस्थानी विरभद्रेश्वर शिक्षण संस्था परळी वैजनाथ चे अध्यक्ष धनवसअप्पा गिरवलकर  तर प्रमुख पाहुणे म्हणुन नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, प्रेरणादायी पिता राष्ट्रीय महिला कुस्ती खेळाडू पै.प्रतिक्षा मुंडे  यांचे वडील सुर्यकांत मुंडे, आश्रम शाळा, परळी वैजनाथ मुख्याध्यापक एन.आर.राठोड, तालुका प्रतिनिधी दै.पुण्य नगरी धनंजय आरबुणे, तालुका प्रतिनिधी प्रविण फुटके आदि मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार, दि.18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05 वाजता लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर, परळी वैजनाथ येथे हे वार्षीक स्नहेसंमेलन बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. 

दरम्यान वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सोहळ्याच्या या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी व पालक तसेच नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी  आपल्या शाळेने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपण सह-कुटुंब  सहपरिवार  उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष मधूकर गिरवलकर, सदस्य देवराव कदम, शेख आरेफ, अनंत कुलकर्णी, प्राचार्या अस्मिता गोरे व लावाण्याई पब्लिक स्कूल शालेय व्यस्थापन समिती व शिक्षक वृंद यांनी केले आहे.

No comments:

Post a comment