तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

अधिकारी जगलेत,झाडे माञ मेली....


मंगरुळपीर तालुक्यात वृक्षलागवड फक्त कागदावरच !

फुलचंद भगत
मंगरूळपीर-तालुक्यात ग्रामपंचायतीसह विविध कार्यालयात वृक्षारोपण करण्यासाठी लाखो रुपयाचा निधी आला होता , मात्र निधी पूर्ण आपसात लाटून व कागदोपत्री वृक्षारोपण दाखवून  शासनाच्या विविध प्रकारच्या कार्यालयामध्ये निधी लाटण्याचा प्रकार बहुतांश ठिकाणी घडला असुन वृक्षलागवडीतली झाडे मेलीत माञ सबंधीत निधी खिशात घालुन अधिकारी माञ जगलेत हेच चिञ सध्या पाहावयास मिळत आहे.तसेच तालुक्यात वृक्षारोपण फक्त कागदावरच दाखवले गेल्याचा प्रकारही झाल्याने याप्रकरणी चौकशी गरजेची असल्याची मागणी जोर धरत आहे.
                         मंगरुळपीर तालुक्यात काही ठिकाणी तर रस्त्यावर पडलेली वृक्षारोपण रोपटे जाग्यावरच सुकून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या गेली.शुद्ध ऑक्सिजन, उन्हाळ्यात जनावरांना , माणसांना, व इतर पशुपक्ष्यांना  सावली हवी आहे व ती  काळाची सर्वांना गरज आहे.हा ऊदात्त हेतु डोळ्यासमोर ठेवुन एक कोटी वृक्षलागवडीचे लक्ष समोर ठेवुन सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामार्फत वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पाडला.अधिकार्‍यांनी वृक्षलागवडीचे फोटो काढुन सोशल मिडिया तसेच वृत्तपञामधे ठळक बातम्याही झळकवल्या परंतु हे करीत असतांना काहींनी तर जुन्याच खड्ड्यात नविन झाडे लावुन वृक्षारोपण करुन निधी लाटला,काहींनी तर नाममाञ झाडे लावुन शासकीय निधी गडप केला असे करत असतांना लावलेल्या झाडांची कीती अधिकारी आणी कार्यालयांनी निगा राखली हे पाहणेही ऊचीत ठरेल.वृक्षलागवडीचा कार्यक्रम कागदोपञी राबवुन अहवाल सादर करन्यातही काही कार्यालयांनी धन्यता मानल्याचे दिसुन येते.सबंधीत कार्यालयांना वृक्षारोपणासाठी दिलेल्या निधीसंदर्भात माहीती घेन्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन पाहणी करणे गरजेचे असुन खरच झाडे लावलीत की नुसता देखावा केला याचे बिंग नक्कीच फुटेल.चहुबाजूंनी हिरवळ व्हावी, पर्यावरणाचा समतोल साधावा,हा उद्देश समोर ठेवून शासनाने वृक्ष लावगड ही महत्वकांशी मोहीम हाती घेतली. मात्र तालुक्यातील कार्यालयाअंतर्गत   मागील 10  वर्षांत लाखो वृक्ष लागवड करुन हरितक्रांती झाल्याचा देखावा  निर्माण केला.काही ग्राम पंचायतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी काही रोपटे मृत अवस्थेत तर काही सुकलेल्या अवस्थेत तर काही जाग्यावरच सुकून मेल्याने एकच लक्ष दोन कोटी वृक्ष हा  उपक्रम  शासनाचा निधी आपल्या तिजोरीत भरण्यासाठी की काय . एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष महत्त्वाकांक्षी योजना सरकारने राबण्याची जबाबदारी तालुक्यातील प्रशासनावर सोपवली तसा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला दोन हजार वृक्ष लागवड व संगोपन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती मात्र फोटोसेशन, प्रसिद्धी पुरती व वृक्ष लागवड कागदावर झाल्याचे दिसून येते आहे. राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी यांनी जनू संगोपना ऐवजी 'झाडे मेले अन् अधिकारी जगले' असे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. बहुतांश प्रशासकीय कार्यालयात वृक्ष लागवड नोंद नसल्याचे एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येते. जर अधिकारी जबाबदारी घेत नसेल तर एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुठमाती देऊन वृक्ष लागवडीत 'गोलमाल ' करुन ही लागवड सुरू असल्याचा प्रकार होताना दिसत आहे. तरी शासनाने वृक्षारोपण करून संगोपन करण्याची जबाबदारीही त्या अधिकार्‍यांना देणे तेवढेच महत्वाचे आहे.त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यात वृक्षलागवडीचा वरिष्ठ प्रशासनाकडुन अाढावा घेणे महत्वाचे आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment