तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

अविष्कार संशोधन अधिवेशनात एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींचे यश


मुंबई,दिनांक:१३ अविष्कार या आंतरविद्यापीठीय संशोधन अधिवेशनात एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी नुकतंच घवघवीत मिळविलं.

  अविष्कार अंतरविद्यापीठीय संशोधन अधिवेशनाचं हे १४वं वर्ष आहे. या अधिवेशनात अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात. त्यांनी केलेलं संशोधन,  नावीन्यपूर्ण पद्धतीने संशोधनाची  मांडणी करण्याची संधी त्यांना अविष्कारच्या  माध्यमातून मिळते.

या संशोधन अधिवेशनात एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या मोईत्रा पांचाली, श्रेया बोकारे, अश्विनी थेर, प्रतिभा नाडर यांनी यश संपादित केले तसेच चॅम्पियन चषक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागाने पटकाविला.
संशोधन क्षेत्रात सध्या विद्यार्थ्यांना देशात तसेच परदेशात अनेक संधी आहेत. अविष्काराच्या माध्यमातून त्यांना संशोधनाची गोडी लागते ,असे  पी.व्ही.डी.टी महाविद्यालयाच्या प्राचार्या व एस.एन.डी .टी महिला विद्यापीठाच्या अविष्काराच्या प्रमुख समन्वयिका डॉ .मीना कुटे यांनी सांगितले.
या यशात प्रा. डॉ. मीना कुटे, प्रा. डॉ.शीख नेमा, प्रा. वैशाली वानखेडे, प्रा. तन्मयी जोशी, प्रा.डॉ. वीरेंद्र नगराळे, प्रा.डॉ.अंजु तुळशीयन, प्रा.रामराजे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, प्र-कुलगुरू डॉ.विष्णू मगरे,  कुलसचिव डॉ. दीपक देशपांडे ,अधिष्ठाता डॉ. अनुभा खळे यांनी सर्व यशस्वितांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.                                        वृत्तलेखन:प्रा अमेय महाजन.संपादन :देवेंद्र भुजबळ.9869484800

No comments:

Post a Comment