तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


सोनपेठ : येथील कै. रमेश  वरपुडकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून औषधी वनस्पतीचे प्रदर्शन व राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन वनस्पती विषयक प्रश्नोत्तरे स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजीत केले आहेत. 
शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात दि. 27 फेब्रुवारी रोजी औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरवण्यात भरवण्यात येणार आहे. तरी परीसरातील सर्व विद्यार्थी  व नागरीकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे अवाहन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकुंदराज पाटील व प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले आहे.
तसेच दि. 28 फेब्रुवारी ला ऑनलाइन बॉटनी क्वीझचे आयोजन करण्यात आलेले असुन देशभरातुन सुमारे 400 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदनी केल्याचे या क्वीझ चे समन्वयक डॉ. मुकुंदराज पाटील व प्रा. विशाल राठोड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment