तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

लवकरच जिल्ह्यात आकाशवाणी केंद्र सुरू होणार


खा.प्रितमताईंच्या मागणीला प्रकाश जावडेकर यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

दिल्ली (प्रतिनिधी) :- परळी-अंबाजोगाई  हे मराठवाड्यातील ऐतिहासिक व शैक्षणिक, सांस्कृतिक, भौगोलिक दृष्ट्या महत्वाची शहरे असून या भागात आकाशवाणी केंद्र सुरू करावे अशी मागणी नागरीकांनी केली होती.जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जनतेच्या या मागणीला केंद्रीय मंत्र्यांपुढे सादर केले असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने जिल्ह्यातील नागरीकांची ही मागणी खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांनी लवकरच पूर्ण होणार आहे.

बीड जिल्ह्यातील परळी,अंबाजोगाई,धारूर,केज तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर,लातूर या भागात आकाशवाणीचे केंद्र नसल्याने या भागात आकाशवाणीचे केंद्र स्पष्टपणे चालत नाही.या भागात आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरीकांमधून होत होती.खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन अंबाजोगाईच्या दूरदर्शन केंद्रात आकाशवाणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या दूरदर्शन केंद्रात आकाशवाणी केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध असल्याने खा.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीला प्रकाश जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून जिल्ह्यात लवकरच आकाशवाणीचे केंद्र सुरू होणार आहे.या भागात आकाशवाणी केंद्र सुरू झाल्यास स्थानिक कलावंताना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे तसेच या भागातील तीस लाख नागरिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा “मन की बात" हा कार्यक्रम सुद्धा ऐकता येणार असल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment