तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

आॅटो पिकअपच्या अपघातात दोन ठार तिघे जखमीमंगरुळपीर येथील घटना

मंगरूळपीर -तालुक्यातील मोझरी नजीक आॅटो आणी पिकअप गाडीच्या अपघातामध्ये दोघेजन ठार झाले असुन तिघे गंभीर जखमी झाले.जखमींना मंगरुळपीर येथील ग्रामिण रुग्नालयात प्राथमिक ऊपचार करुन पुढील ऊपचारासाठी अकोला येथे रेफर करन्यात आले आहे.

कारंजा येथे मयतीच्या कार्यक्रमाला जात असतांना हिंगोली येथील रहिवाशी असलेले
भुरी हसन नंदावाले वय-७२,
हसिना बुरान नौरंगाबादी वय-४०, हे दोघे आॅटो आणी पिकअपच्या अपघाताच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहीती कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला.अपघातात मृत्युमुखी आणी जखमी झालेले हे कारंजा येथे मयतीच्या कार्यक्रमाला जात असतांना वाटेत हा अपघात झाला.ज्यांच्या मयतीच्या कार्यक्रमाला जात होते ते पण अपघातातच मृत्यु पावल्याची माहीती नातेवाईकांकडुन समजली.या घटनेचा तपास मंगरुळपीर पोलिस करत आहेत.

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment