तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

दाऊतपुरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त उद्यापासून


रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची श्रीराम कथा व किर्तन महोत्सव

भव्य सभा मंडपाचे काम पूर्ण; भाविक भक्तांनी उपस्थित रहावे- सरपंच श्रीकांत फड

परळी (प्रतिनिधी) :- 

तालुक्यातील दाऊतपुर येथे महाशिवरात्री निमित्त रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक नागपुरकर यांची रामकथा शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. सप्ताहात किर्तन महोत्सव होणार असून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कथेचे संयोजक तथा सरपंच श्रीकांत फड यांनी कळवले आहे.
भव्य दिव्य श्रीराम कथासाठी दाऊतपुर येथे भव्य दिव्य मंडप उभारण्यात येत आहे.किर्तन महोत्सवात रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक, ह.भ.प.सर्वश्री प्रकाश महाराज साठे, अशोक महाराज इंगवे, बाबासाहेब महाराज इंगळे, बाळू महाराज गिरगावकर, विजयानंद महाराज सुपेकर, सोपान महाराज सानप यांची किर्तन सेवा सादर होणार आहे.गुरूवार दि.20 फेब्रुवारी रोजी राम कथेची सांगता व ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांचे काल्याचे किर्तन होईल व महाप्रसादानंतर सोहळयाची सांगता होणार आहे अशी माहिती संयोजक तथा सरपंच श्रीकांत अनंत फड यंानी दिली आहे. दरम्यान श्रीराम कथेच्या मंडपाची संयोजक तथा सरपंच श्रीकांत फड, अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, उपसरपंच महादेव गडदे, बालासाहेब मुंडे मामा, मारूती सोडगीर, कृष्णा बीडगर, बिभीषण फड, पांडुरंग फड, नितीन बीडगर, पांडुरंग रोडे आदीनी पाहणी केली.

No comments:

Post a comment