तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये चिमुकल्यांचा जल्लोष ; मान्यवरांचा हस्ते बक्षिस वितरण संपन्न


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील  महाराष्ट्र  इग्लिश स्कूल  च्या  वार्षिक  स्नेह संमेलन मान्यवरांचे  हस्ते  संपन्न  झाले 
दि 13  गुरूवार रोजी शहरातील  गोपीनाथ  मुंडे  नटराज रंग मंदीरात  आयोजित  केलेल्या  वार्षिक स्नेह संमेलन  चे ऊदघाटक  पद्मश्री  बाजीराव धरमाधिकारी  यांच्या  हस्ते करण्यात  आले  
या वेळी  प्रमुख पाहुणे म्हणून  सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर आरती जाधव तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी  अन्सारी मॅडम दैनिक पुढारीचे पत्रकार रवींद्र जोशी सर राज्य संघटक मराठा एकीकरण समिती शिवाजीराव शिंदे प्रदिप चाटे सर संचारेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष चिंतामण जोशी सर  राहुल जोशी झुंजार नेता पत्रकार अनंत कुलकर्णी यशराज पब्लिक स्कूल चे अध्यक्ष श्री जनक उबाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते  
या नंतर  पद्मश्री  धरमाधिकारी  यांनी मोलाचे मार्गदर्शन  केले  तसेच शिक्षण विस्तार अधिकारी  अनसारी  यांनी आपलया भाषणात मोबाईल चा जास्त  वापर न करता लहान मुलांना मैदानी खेळ शिकावावे असा संदेश  या वेळी देणयात आले तसेच पञकार प्रा रविंद्र जोशी यांनी आपल्या  भाषाणातुन मोलाचे मार्ग दर्शन केले  

 कार्यक्रमाला या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध गाण्या वरती नाट्य सादर केले जसे की देशभक्तीपर गीत हिंदी मराठी गाणी विविध प्रकारची गाणी ड्रामा लावणी अशा प्रकारे विविध गाण्यावर ती नत्य सादर केले या चिमुकल्यांनी उपस्थित सर्व पालकांचे व मान्यवरांची मने जिंकली व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मुलांचे कौतुक केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक 
प्राचार्य सुनील जोशी सर यांनी केले  तर सूत्रसंचालन अनिल जाधव व पद्मजा शिंदे या दोघांच जुगलबंदीने कार्यक्रम अजून उत्कृष्ट झाला तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले आदमाने प्रीतम आदमाने , स्नेहल बनसोडे , मयुरी आदमाने  निकिता दवणे ,  लाहोटी अनिता  , अर्चना फुलारी, कविता विर्धे ,  गौरी जोशी , मैना भाले  या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनील जोशी   यांनी केले.

No comments:

Post a comment