तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

सोनपेठ शहरातील एल आर के इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न


सोनपेठ / प्रतिनिधी 
मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी येथील एल.आर के.इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले.
या स्नेह संमेलनाचे उदघाटक म्हणुन तहसीलदार डाॅ अशिषकुमार बिरादार हे होते.
सोनपेठ सारख्या छोट्याशा शहरात असलेल्या इंग्लिश स्कूल च्या स्नेह संमेलनाला झालेल्या पालकांच्या गर्दीला यावेळी तहसीलदारांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर कदम हे होते तर प्रमुख उपस्थितीत पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे,नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख,प्राचार्य वसंत सातपुते,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पाटील,ज्योती कदम,प्रा.डाॅ.संतोष रणखांब,प्रा.डाॅ.मुकुंदराज पाटील,मानिकराव निलंगे,दत्तात्रय नरहारे,प्रदिप गायकवाड आदीं मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल कदम तर आभार मुख्याध्यापक दत्तात्रय नरहारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता.
कार्यक्रमासाठी विविध गावांवरून आलेल्या नागरिकांनी,पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment