तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

परळीत एक जणावर खुनी हल्ला ; तिघांच्या विरूद्धात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिनांक 03 फेब्रुवारी रोजी पीडित तरुण माऊली आंधळे हा ट्रक ड्राइवर  रात्री 12 वाजता आपल्या ड्युटीवर जात असताना अचानकपणे बसस्टँड येथे आरोपी रवी हनुमंत फड,बालाजी दहिफळे,विक्रांत सारणीकर व अन्य दोघे जणांनी त्यांची अडवणूक केली व त्याचे अपहरण करून वैद्यनाथ कॉलेज समोरील प्रांगणात नेहुन त्यास  दगड काठ्या व लाथा बुक्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला पण अचानक बाजूला स्थित विद्यानगर येथील रहिवाशांना या घटनेचा सुगावा लागला व तात्काळ नागरिकांनी तेथे जाऊन माऊली आंधळे याची सोडवणूक केल्या मुळे या तरुणाचा  जीव वाचला. वैद्यनाथ सर्जिकल हॉस्पिटल येथे माऊली आंधळे उपचार घेत असून सर्व आरोपीवर भा. द .वी प्रमाणे 307,364,341,323,324,120 ब,143,147,149 या कलमाखाली गुन्हे दाखल झाले असून  शहर पोलिस्टशन चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षण प्रदीप एकशिंगे हे पुढील तपास करत आहेत,   सध्या सर्व आरोपी  फरार झाले आहेत पोलिसांचे एक पथक आरोपींना शोध घेत आहे.
माऊली आंधळे हे परळी तालुक्यातील मरळवाडी येथी रहिवाशी असून,सध्या ते माणिक नगर येथे राहतात व्यवसायाने ट्रक ड्राइवर म्हणून काम करत असताना 3 फेब्रुवारी रोजी नेहमी प्रमाणे रात्री आपल्या ट्रक वर ड्युटी वर जात असताना सदरील आरोपींनी बसस्टँड समोर अचानकपणे माऊली अंधळेची अडवणूक केली व बेदम मारहाण करत त्याचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने वैद्यनाथ कॉलेज समोरील प्रांगणात नेहुन त्याला प्रचंड मारहान करत असताना पीडित जिव वाचवण्यासाठी विद्यानगर भागात पळाला पीडिताच्या मदतीच्या किंकाळ्याचा आवाज ऐकून  विद्यानगर येथील रहिवाशी तेथे धावून आले , त्या प्रसंगी आरोपींनी पीडित चोर आहे म्हणून आम्ही त्याला मारत आहोत असे सांगितले परंतु नागरिकांनी हा चोरीचा प्रकार नसल्याचे ओळखून त्यांनी त्याची सोडवणूक केली व त्या मुळे पीडित माऊली आंधळे यांचे प्राण वाचले,या आरोपी मधील जवळपास सगळेच आरोपी सराईत गुन्हेगार असून शहरात या पूर्वी ही सामाजिक सलोखा विस्कळीत या आरोपींना केलेला आहे, तसेच रहदारीच्या रस्त्यावर नाथ टॉकीजच्या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढणे शेरेबाजी करणे असे प्रकार या सदरील गुंडा कडून नेहमी होत आले आहेत तसेच सगळ्यांवर या पुर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत काहींना हृद्यपरीच्या नोटीस सुद्धा पोलीस प्रशासनाने बजावलेल्या आहेत तरी या आरोपींना अटक करून अंदरट्रायल ठेऊन फास्ट्रक न्यायालयात गुन्हा चालवून लवकरात लवकर कडक शासन व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चौकट
या मधील आरोपी रवी उर्फ कान्हा हनुमंत फड हा सराईत गुन्हेगार असून या पूर्वी ही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत,त्याला प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन सुद्धा  जामिनीवर तो बाहेर आहे, वारंवार पोलिस प्रशासनाने त्याला नोटीस व समुपदेशन करून सूचना  देऊन सुद्धा आरोपी सुधारत नसल्याने हा गुन्हा फास्ट्रॅक कोर्टात अंडरट्रायल चालवावा अशी मागणी नागरिकां मधून होत आहे.

No comments:

Post a Comment