तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

परळीत निष्क्रीय महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात परळीत भाजपाचे एल्गार धरणे आंदोलन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  विश्वासघातकी राज्यसरकारच्या विरोधात परळी भाजपाच्या वतिने उपविभागीय कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्यात आले.प्रारंभी शिवाजी चौक येथील छ.शिवाजी महारांना वंदन करुन या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

उपविभागीय कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हणाले आहेत की, शेतक-यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.या महाविकास आघाडी सरकारने अवकाळीग्रत शेतकरयांना प्रति हेक्टरी ८ हजार रुपये पेक्षा एकही रुपयाची अधिक मदत दिलेली नाही. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करु, अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. म्हणुन परळीसह राज्यात निष्क्रीय शासनाच्या विरोधात परळीत उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर भाजपाचे एल्गार आंदोलन करण्यात आले.
बीड जिल्ह्याचा रबी पीक विमा भरणा करण्यासाठी शासनाने एजन्सी नेमलीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परळीच्या वाण घरणातील शहराला आरक्षित पाण्याच्या व्यतिरिक्त असणारे पाणी शेतकन्यांना देण्याची तात्काळ सोय करावी. परळी शहर व परिसरात होणारे राखेचे प्रदूषण थांबविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी. परळी शहर व तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा घालुन गुंडावर कडक कारवाई करावी. परळी- अंबाजोगाई रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे. जाणीवपुर्वक आमच्या सरकारने दिलेल्या विकास कामाना स्थगिती दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा भाजपा परळी शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मशुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपुर्ण देश हादरून गेला आहे. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला, तरुणी, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आंदोलन करण्यात आले.याआदोलनात भाजपा राज्य सरचिटणीस राजेश देशमुख ता.अध्यक्ष सतिष मुंडे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शिवाजी गुट्टे ,अशोक जैन, दत्ताप्प्आ ईटके गुरूजी, विकासराव  डुबे, प्रा.विजय मुंडे,  निळकंट चाटे, राजेश गित्ते, रवि कांदे,महादेव इटके,.उत्तम माने, राजाभाऊ ओझा, प्रा.पवन मुंडे, अश्विन मोगरकर,  संजय मुंडे, सरपंच अनिल गुट्टे, सरपंच भुराज बदने,नारायण गुट्टे, गणेश गित्ते, रवि कराड, फुलचंद मुंडे, दत्ता देशमुख, गोविंद मोहेकर, गणेश होळंबे, शिवाजी शिंदे, प्रभू आंधळे, गोपीनाथ गित्ते, प्रा.बिभीषण फड, अमोल वाघमारे, किरण धोंड, विजय बडे  व भाजपाचे सर्व पदाधिकारी अदीनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment