तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

दिपीका दिनेश कार्तिकला लाभदायी ठरली


                दिनेश कार्तिक विश्वचषक २०१९ पर्यंत भारतीय संघातला महत्वाचा घटक होता. परंतु त्या स्पर्धेत त्याला केवळ उपांत्य फेरीच्या न्यूझिलंड विरूध्दच्या महत्वाच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. नेमकी त्या सामन्यात रविंद्र जडेजा सोडून कोणत्याही भारतीय फलंदाजाला टिकून खेळण्यात यश न आल्याने भारत तो सामना हरला व विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही तेथेच विरले. त्यानंतर संघात फार मोठे बदल झाले नाहीत पण यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला संघातून काढून टाकण्यात आले. याबरोबरच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पुर्णविराम लागल्यातच जमा झाला.
                   वास्तविक दिनेश कार्तिकच्या जीवनात घडलेला हा काही पहिलाच मोठा प्रसंग नव्हता. त्याचे जीवनच मुळी चढउतारांच्या घटनांनी बनले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या उदयापूर्वी तो संघाचा नियमीत यष्टीरक्षक होता. परंतु धोनीच्या प्रभावी खेळामुळे त्याचे स्वतःचे संघातील स्थान पक्के झाले. परिणामतः कार्तिक संघाच्या आत बाहेर करत राहीला.
                    हे कमी की काय म्हणून त्याच्या व्यक्तीगत जीवनात भयंकर भूकंप झाला. त्याची पत्नी निकीता त्याचाच तामीळनाडू रणजी संघातला सहकारी व भारतीय संघाचा तत्कालीन सलामीवीर मुरली विजयच्या प्रेमात पडली. पुढे जात तिने दिनेशला घटस्फोट देऊन मुरली विजयशी लग्न केले. या घटनेने दिनेश पुरता उध्वस्त झाला होता. जगणं व खेळणं तो पुर्णपणे विसरून गेला होता.
                   पण म्हणतात ना एका वाईट स्वप्नानंतर सोनेरी क्षण येत असतो. अगदी तसंच त्याच्या आयुष्यात घडले. भारताची अव्वल दर्जाची स्क्वॅशपटू दिपीका पालिकेलशी त्याचे लग्न झाले व त्याच्या बिघडलेल्या जीवनाची घडी व्यवस्थीत बसली व संघातील त्याचे महत्वही वाढले.
                    फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात प्रेमवीर आपल्या प्रेमाला सुरुवात करतात अथवा नवीन मुलामा देतात. अशाच आठवणीतून दिनेश कार्तिकच्या जीवनाला आकार देणाऱ्या त्याच्या प्रेमकहाणीची आपल्याला माहिती देत आहोत. दिपीका पालीकेल भारताची नंबर एकची स्क्वॅश खेळाडू. दिपीकाच्या आईचा खेळाडूंना परदेशी जाण्यासाठी तिकीट बुकींगचा व्यवसाय. दिनेशही भारतीय संघाचा सदस्य असल्याने त्याला विदेश वारीसाठी विमान तिकीट बुकींग साठी त्यांच्याकडे जायचा. त्यामुळे दिपीकाच्या आईवडिलांशी दिनेशची चांगलीच ओळख होती.
               दिनेशची व दिपीकाची मैत्री वाढण्यापूर्वीची गोष्ट. सामान्यपणे प्रथम भेटणारे प्रेमवीर हाय, हॅलोने सुरुवात करतात पण या बहाद्दराने दिपीकाला अशी कोणतीही औचारीकता न करता थेट पहिला मेसेज टाकला तो डिनरला हॉटेलात जाण्या संबधीचा. अचानक आलेल्या या ऑफरने सामान्य मुलीप्रमाणे दिपीकाही बावरली. विशेष अशी वैयक्तिक ओळख नसल्याने तीने त्याचा तो प्रस्ताव टाळला.
                यानंतर दिनेश दिपीकाला सतत मेसेज करू लागला तर कधी डिनरचेही निमंत्रण पाठवायचा. परंतु दिपीका स्पर्धा, प्रवास व इतर कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्याच्याशी संपर्क करत नव्हती एव्हाना मोकळ्या वेळेतही ती त्याच्याशी बोलणे टाळायची.  त्याला टाळायचा काहीतरी बहाणा करायची. खासकरून ती त्याला सांगायची की, उद्या माझी फ्लाईट आहे.
                  एक दिवस विचित्र योगायोग घडला. आदल्या दिवशी तिने त्याला सांगितले होते की उद्या सकाळी ६ वाजता तिची फ्लाईट आहे व दुसऱ्या दिवशी ती सकाळीच चेन्नईतील नेहमीच्या जीममध्ये कसरतीसाठी गेली. त्याच जीममध्ये दिनेशही येत असे हे दिपीकाला माहीत नव्हते. दिपीकाला पहाताच त्याची कळीच खुलली. जीममध्ये दिपीकाला बघताच दिनेश तिच्या जवळ गेला व सकाळी ६ वाजता तुझी फ्लाईट होती ना ? असे विचारले, यावर ती बावरली. अखेर एकदची पीडा कटवावी म्हणून तिने त्याच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला व उदया सकाळी ७ वाजता फ्लाईट असल्याचे सांगितले.
                एवढं बोलून प्रकरण थांबेल असे तिला वाटले, पण दिनेशने कोणताही विचार न करता तिला उद्या भेटण्याचे सांगीतले. विशेष म्हणजे त्या दिवशी ते दोनदा भेटले. पण दिनेशला काही राहावले नाही. अखेर त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिलाच. हि सर्व गोष्ट तिने तिच्या आईला सांगितली. यावर तिची आई चकीतच झाली. कारण दिनेश हिंदू तर दिपीकाचे कुटुंब ख्रिश्चन होते व दिनेशचे पहिले लग्नही झाले होते.
                 त्यानंतर दिपीकाच्या आईने दिनेशशी सविस्तर चर्चा केली व संमती दिली. ८ ते ९ महिने ते रिलेशनशीपमध्ये राहिल्यांनतर तीन वर्षांनी विवाहबध्द झाले. प्रथम दिपीकाच्या ख्रिश्चन धर्मानुसार १८-८-२०१५ रोजी तर दिनेशच्या हिंदु धर्मानुसार २० ऑगष्ट २०१५ रोजी विवाहविधी पार पडला.
                   या लग्नानंतर दिनेशच्या खेळात निखार आला. त्याचे जीवन स्थिरस्थावर झाले.पदार्पणापासून भारतीय संघात आत बाहेर करत असलेला दिनेश अचानक संघाचा प्रमुख घटक बनला. धोनीच्या उपस्थितीतही त्याला संघात स्थान मिळू लागले.घाईशी आलेले बरेच सामने त्याने लिलया जिंकून दिले. आजही तो आयपीएलमध्ये केकेआरचा कर्णधार आहे.

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment