तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

आरोग्य वर्धिनी केंद्राच्यावतीने मौजे लिंबुटा येथे आयोजित योग शिबिराला चांगला प्रतिसाद


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे बुधवार ,दि.५फेब्रुवारी रोजी पहाटे ५.०० वा. आयोजित एक दिवसीय योग  शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.
आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र,सिरसाळा ता.परळीच्या वतीने  व सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती, लिंबुटा यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.योग शिक्षक बालासाहेब कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पारपडले.  
प्रारंभि, सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांचे योग शिक्षक डॉ. पी.जी.पवार यांनी योग म्हणजे काय,त्याचे आपल्या आयुष्यातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरात योगशिक्षक श्री. कराड यांनी नौकासन कपालभाती,बसरिका,वज्रासन,अर्धमचिंद्रासन,
हालासन,वृक्षासन स्वत:प्रत्यक्ष करून दाखऊन शिबिरार्थिंकडून करून घेतले. 
कोणते आसन केल्यांनतर कोणकोणत्या आजारांपासून आपली मुक्तता मिळूशकते  आणि योगासने व प्रणायाम यांचे महत्व यासंदर्भात ही श्री कराड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. योगशिक्षक म्हणून मोहा प्राथमिक आरोग्य केंंद्रांतंर्गत  नवनियुक्त योगशिक्षक विवेक गोविंदराव आघाव यांनीही योगशिबिरास हजेरी लाऊन, मयुरासन आणि इतर काही योगासने करून दाखवली.
        शिबिरास सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरिक्षक आर.एम.राऊत,प्रयोग शाळा     वैज्ञानिक अधिकारी शिवाजी राठोड,गोविंद देवकते आदी उपस्थित होते .
शिबीर यशस्वी करण्यासाठी एम.एम.लटपटे,आशा कार्यकर्ती सौ.अर्चना निवृत्ती केकाण,वर्धिनी सौ.मीनाक्षी भागवत मुंडे,सौ.सुलभा खुशाल कांबळे,सी.आर.पी.जयश्री माणिकराव मुंडे  आदींनी परिश्रम घेतले.
सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा चे सर्वश्री कार्याध्यक्ष विश्वनाथ (आबा)मुंडे,उपाध्यक्ष विश्वांभर दोडके, सहसचिव इंद्रमोहन मुंडे,कोषाध्यक्ष शिवाजी मुंडे,सल्लागार रामराव दिवटे( नाना),आदिनाथ दोडके आदींचेही शिबीर यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.आभार प्रदर्शन सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक लिंबाजी मुंडे यांनी केले.

No comments:

Post a comment