तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

ग्रामीण भागातील माणसांचे दरडोई उत्पन्न वाढून त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार!जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे प्रतिपादन

पंचायत समिती मंगरूळपीर येथे सभा संपन्न

फुलचंद भगत
वाशिम, दिनांक 26:
केंद्र सरकारकडून वाशिम जिल्हा आकांक्षीत म्हणून घोषित करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून या कामी पदाधिकारी यांची साथ लाभणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
पंचायत समिती मंगरूळपीर येथे विविध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी दिनांक 26 रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती सभापती दिपाली इंगोले, उपसभापती हरीश महाकाळ, गटविकास अधिकारी राम कृष्ण पवार, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पाकधने, कांचन मोरे, दिलीप मोहनावाले, नीलिमा देशमुख यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे म्हणाले “ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी आपण तालुकानिहाय बैठकींचे सत्र सुरू केले आहे. याची सुरुवात मंगरूळपीर तालुक्‍यापासुन करण्यात आली आहे. या माध्यमातून काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी व लोकप्रतिनिधींच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे.” तालुक्यातील विविध विभागाअंतर्गत रिक्त जागा त्यासाठी आपण तात्काळ पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 
पंचायत समिती अंतर्गत शिक्षण, आरोग्य, कृषी, 14 वा वित्त आयोग, पाणीपुरवठा, स्वच्छता, पशुसंवर्धन, एम एस आर एल एम उमेद प्रकल्प, वन खाते इत्यादी विभागाअंतर्गत झालेल्या कामांचे व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा जि.प. अध्यक्ष ठाकरे यांनी घेतला.

दबंग सरपंच आणि सिंघम ग्रामसेवक असताना ”गावची नळयोजना बंद कशी?
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेत असताना तालुक्यातील पोघात या गावाची नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याची बाब समोर आली. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी या गावात दबंग सरपंच आणि सिंघम ग्रामसेवक असताना गावाची पाणीपुरवठा योजना बंद कशी काय आहे? असा सवाल केला. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. या प्रकारामुळे सभागृहात उपस्थित असलेले पोघातचे ग्रामसेवक चंदू पाटील हे मात्र ओशाळून गेले होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर चंद्रकांत ठाकरे यांनी मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये आज पहिल्यांदाच सभा घेतली. सलग सहा तास चाललेल्या या सभेमध्ये सर्व योजनांची खडा न् खडा माहिती  असलेल्या ठाकरे यांनी अद्यावत माहिती न ठेवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या सभेदरम्यान चंद्रकात ठाकरे प्रत्येक योजनांचे बारकावे समजुन सांगत होते.  यामुळे सभागृहात ऊपस्थित नवीन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे जणू एक प्रकारे प्रशिक्षणच होत असल्याचे जाणवत होते. बैठकीच्या सुरुवातीला पंचायत समिती सभापती दिपाली इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment