तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 8 February 2020

महिलांच्या सुरक्षित वातावरणसाठी उपाय योजना कराव्यात-अॅड.हेमाताई पिंपळे


राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या  वतीने निवेदन सादर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यादृष्टीने पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. रोडरोमियोंना मोकळे रान मिळणार नाही याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यां नी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या मराठवाडा निरीक्षक अॅड. हेमाताई पिंपळे यांनी केली आहे. 
  याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या  वतीने मराठवाडा निरीक्षक अॅड. हेमाताई पिंपळे (लोमटे) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात महिला सुरक्षेच्या दृष्टीने मागण्या करण्यात आल्या.शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात शाळा - महाविद्यालय भरताना व सुटताना काही असामाजिक तत्वातील युवक घिरट्या घालताना दिसतात व हेच संधी पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थींना पाहून अश्लील शेरेबाजी करतात व छेडछाड करतात. अशा लोकांचे मनोबल वाढत आहे. विद्यार्थीनींना मोठ्या प्रमाणावर या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कारणास्तव चिडीमार पथकाच्या गस्ती फेऱ्यात वाढ करण्यात यावी व या गैर प्रकार करणाऱ्या विरुध्द कठोर कार्यवाही करावी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी मराठवाडा निरीक्षक अॅड.  हेमाताई पिंपळे, जिल्हा उपाध्यक्षा अन्नपुर्णा जाधव, युवती अध्यक्षा पल्लवी भोयटे, शहराध्यक्षा अर्चनाताई रोडे,सुलभा साळवे,राधाताई फकीरे , सुनीता बोडखे, शहर सरचिटणीस गोदावरी पोखरकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment