तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

हेळंब ते नागदरा व मालेवाडी रस्त्याचा अहवाल उपायुक्तांनी मागविला ; मावेजा मिळाल्याशिवाय रसत्याचे काम करू देणार नाही शेतकरी

 आक्रमक 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे हेळंब येथील हेळंब शिव ते वनवासवाडी मार्ग मालेवाडी व हेळंब ते नागदरा मार्ग दौंडवाडी रोडचे काम जमिनीचे संपादन न करता केले जात असल्याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल उपायुक्त पुनवर्सन औरंगाबाद यांनी घेतले असून या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. 
    या संदर्भात अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील हेळंब शिव ते वनवासवाडी मार्गे मालेवाडी व हेळंब ते नागदरा मार्गे दौडवाडी या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर भूसंपादन न करता व शेतकऱ्यांना जमिनी मावेजा न देता जमिनी ताब्यात घेतल्या संदर्भात राम माणिक पाळवदे व इतरांनी आक्षेप घेतला होता. शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांच्या कडे एक निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत पुनर्वसन उपायुक्त औरंगाबाद यांनी घेतली. 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकरणामध्ये प्रचलित नियमांनुसार आवश्यक असणारी कार्यवाही करून अर्जदारांना याची माहिती द्यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उपायुक्त कार्यालयास सादर करावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता रोडमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. 
      दरम्यान हा रस्ता ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना मावेजा मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम करू दिले जाणार नाही असा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment