तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

परळीकरांच्या उदंड प्रतिसादात माणसी नाईकच्या 'नाद करायचा नाय' कार्यक्रमाने महाशिवरात्री महोत्सवाची सांगता...
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २६) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी परिषदेच्या वतीने आयोजित महाशिवरात्री महोत्सवाची काल (दि.२५) चैत्राली राजे प्रस्तुत सिने अभिनेत्री माणसी नाईकच्या बहारदार मराठी लावण्यांच्या 'नाद करायचा नाय' या कार्यक्रमाने सांगता झाली.

यावेळी परळी व परिसरातील रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात माणसी व तिच्या सहकलाकारांनी एका पेक्षा एक जोरदार गीते व महाराष्ट्राची लोकपरंपरा असलेल्या लावण्या सादर करत उपस्थितांची मने जिंकली. अनेक गीतांवर 'वन्स मोर' च्या फर्माईशी झाल्या. तर अमर मैदानाचा परिसर शिट्या व टाळ्यांनी निनादून निघाला. 

गेल्या तीन दिवसांपासून परळी नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या वैद्यनाथ महाशिवरात्री महोत्सवाची या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.

या महोत्सवादरम्यान यात्रा महोत्सवासह परळी केसरी या जंगी कुस्त्याची दंगल, सिने अभिनेत्री टिकटॉक फेम माधुरी पवारच्या 'मराठमोळी परंपरा' हवं संगीत रजनी कार्यक्रम, महाराष्ट्राचा आवाज, गायक, कलाकार, निर्माता, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या सुरेल गीतांची लाईव्ह कॉन्सर्ट व काल (दि.२५) अखेरच्या दिवशी माणसी नाईकचा 'नाद करायचा नाही' इत्यादी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सर्वच कार्यक्रमांना परळी व परिसरातील नागरिकांनी तोबा गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment