तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

महावितरणच्या अतिरिक्त कामामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांचा वाढणार ताण.....!परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महावितरणच्या आता कर्मचाऱ्यांचा वाढणार ताण अंबाजोगाई विभागातील सर्वच लाईनमन आता औद्योगिक ग्राहकांच्या मिटर रिडींग घेण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांनी नुकतेच एक परिपत्रक काढून दिले आहेत. यामुळे आगोदरच मुळात अतिशय मनुष्यबळात आणि सुविधांच्या अभावामुळे सुरू असलेल्या महावितरणच्या कर्मचारी यांच्यावर आणखी ताण वाढला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई विभागीयतील तांत्रिक कर्मचारी यांना औद्योगिक ग्राहकांच्या मिटर (बिलिंग) रिडींग घेण्याचे नुकतेच 28 जानेवारी रोजी एक परिपत्रक काढून कार्यकारी अभियंता कुरेशी यांनी निर्देशित केले आहे. पहिले कर्मचारी यांच्यावर असणारा कामाचा बोजा वाढल्याने महावितरणच्या अंबाजोगाई विभागातील कर्मचाऱ्यांचा ताण वाढल्यामुळे अनेक बाबींचा ताणतणाव वाढणार आहे.   महावितरणच्या अंबाजोगाई विभागाअंतर्गत अंबाजोगाई, तेलगाव, परळी, धारूर, केज व माजलगाव उपविभागातील तांत्रिक (वायरमन) कर्मचाऱ्यांना औद्योगिक ग्राहकांच्या मिटर रिडींग घेण्याचे अतिरिक्त भार पडल्यामुळे ताण वाढणार आहे. तांत्रिक (वायरमन) कर्मचारी हे आधीच देखभाल,दुरूस्ती,वसूली ई. कामे करण्यात दिवसभर व्यस्त असतात.त्यामुळे त्यांच्यावर आता अतिरिक्त कामाचा बोजा पडला आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांच्या मिटर रिडींगसाठी कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. या प्रशिक्षण न देताच त्यांच्या जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  महावितरणच्या आगोदरच भोंगळा कारभाराविरध्दात ठिणग्या पडल्या आहेत. बिलांचा घोळा व वसुली चे कामास मिटर रिडींगसाठी वेळ लागणार म्हणून वसूलीच्या कामावरही परिणाम दिसणार आहे. आता महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनाच वसूली करताना बिल नादुरूस्तीमुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महावितरण कडून नव्याने देण्यात आलेले अतिरिक्त कामांच्या जबाबदारी मुळे कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण वाढणार आहे. तसेच याचा फटका वीज ग्राहकांना देखील बसू शकतो. महावितरणकडून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे काम करावे. कर्मचारी यांच्या कामाचा अतिरिक्त ताणामुळे महावितरणला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. 
बिलिंग करण्यापासून तांत्रिक बिघाड सोडविण्यासह
ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणच्या कर्मचा यांवर ताण येतो आहे. आता त्यातच अतिरिक्त भार टाकल्यामुळे ग्राहकांच्या समस्यादेखील लवकरात लवकर सोडवून त्यांना उत्तम सेवा देण्याचे धोरण बारगळल्याशिवाय राहणार नाही. औद्योगिक ग्राहकांच्या मिटर रिडींगसाठी कितपत यशस्वी ठरेल, कर्मचारी कितपत प्रतिसाद मिळेल, कर्मचारी यांच्यावर किती ताण वाढविणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

No comments:

Post a comment