तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल इंजि.भगवान साकसमुद्रे मूकनायक पुरस्काराने सन्मानितपुणे (प्रतिनीधी) :-
मूकनायक पत्रकार संघ पुणे च्या वतिने पत्रकारिता क्षेत्रात राहुन फुले-आंबेडकरी चळवळीत कार्य करणार्या व्यक्तींचा विचार धारेचा प्रचार तथा प्रसार व अन्याया विरुध्द वाचा फोडणार्‍या झुंजार पत्रकारांना  मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त राज्य स्थरिय मूकनायक पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला यात बीड जिल्ह्यातून परळीचे इंजि.भगवान साकसमुद्रे व बीडचे राजु जोगदंड यांच्या सह अनेकांना   सन्मानित करण्यात आले.
          मूकनायक पत्रकार संघ व   मूकनायक शताब्दी महोत्सव पुणे च्या वतिने बालगंधर्व येथे पत्रकार सन्मान सोहळा काल दि. 2 फेब्रुवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमाची उद्घाटन भारतीय घटनेच्या उद्देशीकीचे सामुहीक वाचनाने झाली.  मा.समाजकल्याण आयुक्त आर.क.े गायकवाड(आय.ए.एस.), सा.चित्रलेखाचे संपादक  ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी सत्यशोधीका नेत्या प्रतिमा परदेशी, साहित्यीक रत्नलाल सोनागरम, गोवाचे  बांदेकर, जेष्ठ सामजिक कार्यकर्ते रमेश राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       आजही समाजात जागृती करण्याची गरज असुन समाज जागृती करणार्या व्यक्तींना कार्य करण्यासाठी असे पुरस्कार प्रेरणादायी ठरतात. महराव की, या वर्तमान पत्राची टिळांनी त्याच्या पत्रात जाहिरात ऐखिल छापण्यास नकार दिला होता. बाबासाहेबांच्या मूकनायकाला छ.शाहु महाराजांनी 2500 रुपये वर्तमान पत्र काढण्यासाठी सहकार्य केले होते. पहिल्या अंकात संत तुकाराम महाराजांचे ब्रिद वाक्य घेतले होते.व्याकरणीक दृष्ट्या एक हि चुक नसलेला अंक होता. त्यांनी मराठा समाजाला पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदीरात प्रवेश नाकारला होता. झालेल्या घटनेचा त्यांनी वृत्तपत्रात स्थान दिल होते. या पुरस्कार सोहळ्यात  महाराष्ट्रातील पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणार्‍या फुले- आंबेडकरी चळवळीतील पत्रकार बंधू आणि भगिनींचा सत्कार केला. यात परळीचे भगवान  साकसमुद्रे आणि बीड चे राजु जोगदंड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी  मुकनायक  समितीचे नाना गायकवाड, विजय भुजबळ, राज वाघमारे. लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.या सोहळ्यास महाराष्ट्रातुन फुले-आंबेडकरी चळवळीतील मान्यवर तसेच पत्रकार क्षेत्रात काम करणारे व्यक्ती मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment