तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या परळी तालुका कार्य अध्यक्षपदी सय्यद अल्ताफ यांची नियुक्ती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  अखिल भारतीय  किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधानसभेचे सभापती  नाना पटोले यांच्या आदेशान्वये मराठवाडा प्रदेश अध्यक्ष किसान काँग्रेस एडवोकेट माधव जाधव यांनी परळी वैजनाथ येथील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते सय्यद अल्ताफ यांची परळी तालुका कार्याध्यक्षपदी सर्वसंमतीने नियुक्ती पत्र देऊन निवड केली यावेळी किसान काँग्रेसचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष एडवोकेट माधव जाधव यांनी परळी तालुक्यात कार्याध्यक्ष  पदावरून नियुक्ती करताना सांगितले की भविष्यात निश्चित काँग्रेस पक्षाचे काम वाढतील सय्यद अल्ताफ यांनी काँग्रेस पक्षाचे कार्य परळी तालुक्यात सर्व नेत्यांच्या संमतीने पक्षकार्य वाढून कार्य करण्यात येईल पूर्वी काँग्रेसच्या अनेक पदावर सय्यद अल्ताफ यांनी कार्य केलेले आहे या अनुभवावरून पक्षसंघटन मजबूत करू असे त्यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार किसान काँग्रेसचे परळी तालुका अध्यक्ष लहूदास तांदळे गणपत आप्पा कोरे विश्वनाथ गायकवाड शेख महंमद यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment