तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

पालम तहसिलदार ज्योती चव्हाण व नायब तहसिलदार मंदार इंदुरकर यांची बदली करून लोकप्रतिनिधींवर झालेले खोटे गुन्हे मागे घेण्याचे सर्व पक्षियाने दिले निवेदन

अरुणा शर्मापालम :- तहसिल कार्यालयात दि. 20 फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या कामाकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधीना तहसिलदार ज्योती चव्हाण व नायब तहसिलदार मंदार इंदूरकर यांनी अपमाणास्पद वागणुक देऊन लोकप्रतिनिधी विरूद्ध रात्री उशिरा खोटे गुन्हे दाखल केले. सदरील लोकप्रतिनिधी नेहमी जनतेच्या विविध कामाकरीता तहसिल कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयास भेटी देत असतात तसेच दाखल केलेल्या तक्रारीत घटनेची वेळ दुपारी 3:45 वाजता नमुद केले आहे सदरील या वेळी गणेशराव रोकडे हे तहसिल कार्यालयाच्या वर असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात अभिन्वय सहकारी संस्थेच्या कामाकरीता कार्यालयात हजर होते व या कार्यलयाच्या खालच्या भागातील तहसिल कार्यलयात सदरील वाद सुरू झाल्या नंतर रोकडे हे मध्यस्थी करण्याकरिता गेले होते तहसिलदार ज्योती चव्हाण यांना सर्व सामान्य जनतेस कुठल्याही कामाबदल विचारपुस करण्यास गेले असता अपमानास्पद वागणुक देतात व नायब तहसिलदार मंदार इंदुरकर हे सुद्धा सर्व सामान्य जनतेस व लोकप्रतिनिधीना उद्धट भाषेत उत्तरे देतात व कसल्याही प्रकारची दखल घेत नाहीत सदरील प्रकारचे अनुभव तालुक्यातील जनता तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधीकडे मांडत असतात व या प्रकाराची वारंवार पुर्नरावृत्ती घडत असून या बदल जाब विचारण्यास गेलेल्या गणेशराव रोकडे व सिताराम राठोड यांच्याविरूद्घ वैयत्तीक द्वेषातुन खोटा गुन्हा दाखल केला आहे तरी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी वरिल प्रकरणाची त्वरीत दखल घेऊन तहसिलदार व नायब तहसिलदार यांची त्वरीत बदली करावी व रोकडे आणि राठोड यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्याचे आदेश द्यावेत अन्यथा पालम तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दि. 24 फेब्रुरवारी रोजी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले आहे यावेळी पालम चे सर्व पक्षिय पदधिकारी व परभणी जिल्हाचे खासदार बंडू जाधव सह वसंतराव सिरस्कार राष्ट्रवादी ता.अध्यक्ष, हानूमंतराव पौळ शिवसेना ता.प्रमुख, शिवाजीराव दिवटे भाजपा ता.अध्यक्ष, गुलाबराव सिरस्कर कॉग्रेस ता.अध्यक्ष, आण्णा साहेब किरडे उप सभापती पं.स. पालम, भास्करराव सिरस्कर, नारायणराव दुधाटे, बाळासाहेब कुरे, जयश्रीताई वाडेवाले, ताराबाई माधव गिनगिने, बालाजी वाघमारे, सौ. अनिताताई हात्तीअंबिरे, जालिंदर हात्तीअंबिरे, बाळासाहेब रोकडे, उबेदुलाखाँ पठाण, बिसमिलाबी मंजलेखाँन पठाण, रूखयाबी अशरफ पठाण, फरजाना मोबीन खुरेशी, अंजुमबेगम इलियासखाँन पठाण, फातेमा मनुर खुरेशी, मंगलाताई वसंतराव सिरस्कर, शेख सुलतानाबी मुस्तफा, खुरेशी बेगम इब्राहीम, मलताताई गजानन रोकडे, द्रोपदाबाई कामाजी ताटे, विजयकुमार घोरपडे, मंगेश जोधळे, विठ्ठल टोम्पे, संजय थिट्टे, शेख गोरीबी मोहियोदीन, लक्ष्मणराव रोकडे, गजानद पवार, शेख आहेमद, भगवान सिरस्कर, डॉ. रामराव उंदरे, लिंबाजी टोले, लालखा पठाण, अशदूलाखॉ पठाण, अजिमखॉ पठाण, मोबीन खुरेशी, गफार खुरेशी, महमद खुरेशी, शेख मुस्सा, शेख अकबर, चंद्रकांत ताटे, गणेश हत्तिअंबिरे, दिपक रूद्रवार, रहिमतुल्लाखाँ पठाण, कैलास चामले, विश्वाभर बाबर, कैलास रूद्रवार, साबेर खुरेशी, मोसीनखान पठाण, काशिनाथ भस्के आदिच्या स्वक्षरया निवेदनावर आहे.

No comments:

Post a Comment