तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

परळीत स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी वैजनाथ येथे संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांनी सुरुवातीला विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला यामध्ये सकाळ सत्र वर्ग पाचवी ते दहावी या सत्रामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु . भक्ती भीमाशंकर हालगे या विद्यार्थिनीने काम पाहिले तसेच लिपिक म्हणून चि . प्रथमेश अरूण नानोटे  या विद्यार्थ्याने काम पाहिले या सकाळच्या सत्रामध्ये एकूण 36 विद्यार्थी शिक्षकांनी सहभाग घेतला दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे पहिली ते सातवी या सत्रात मुख्याध्यापक म्हणून कु . आयोध्या सूर्यकांत वाघमारे या विद्यार्थिनीने मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले तसेच लिपिक म्हणून कु . रेवती धोंडीराम धुमाळ या विद्यार्थिनीने काम पाहिले या सत्रामध्ये एकूण 34 विद्यार्थी शिक्षकांनी सहभाग घेतला या दिवसभरामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या जीवनातील शिकवण्याचा पहिला आनंद घेतला एकंदरीत पाहता शाळेमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झाले होते प्रत्येक विद्यार्थ्याने सामर्थ्याने शिकवण्याचा प्रयत्न केला शाळेच्या वतीने उत्कृष्ट अध्यापन याद्वारे स्पर्धाही ठेवली होती त्यामुळे या शिक्षक विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करत उत्कृष्ट अध्यापन केले तसेच उत्तम शिस्तीमध्ये आपले अध्यापन पार पाडले तसेच शिक्षकांची दैनंदिन कामे व्यवस्थित पार पाडली या कार्यक्रमास सर्व शिक्षक व पालकांनी आपापल्या पाल्यामध्ये उत्साह जागवला हा स्वयंशासन दिन उत्कृष्ट रीतीने पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक  परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment