तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

जागतिक संविधान व संसदीय संघाच्या कार्याने भारावले - नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक         सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे
     - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघ या संस्थेचे सामाजीक क्षेत्रातील कार्य इतके सुंदर आहे की त्यामुळे समाजाच्या अनेक क्षेत्रात वंचित राहिलेल्या गुणवंत व्यक्तींना हक्काचे व्यासपीठ मिळाले व जागतिक स्तरावर स्वतःला झळकण्याची संधी उपलब्ध झाली. यामुळे मी अक्षरशः भारावून गेले आहे असे भावुक प्रतिपादन श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले आहे. येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात आयोजित टपाल तिकिट अनावर प्रसंगी त्या बोलत होत्या.
            जागतिक संविधान व संसदीय संघाचे सदस्यत्व प्राप्त झाल्याबद्दल चौदा मान्यवर सदस्यांचा फोटो असलेले पोस्टाचे तिकीट भारतीय डाक विभागाने जारी केले त्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक या  होत्या. तर प्रमुख पाहुणे गिनिज बुक रेकॉर्डमध्ये नोंद असलेले पहिलवान डॉ. बाळासाहेब मंगसुळे हे होते तर विशेष निमंत्रीत पाहुणे म्हणून दै. पुढारीचे श्रीरामपूर कार्यालयाचे अधिक्षक विष्णू वाघ व नगरसेवक राजेंद्र पवार हे होते.
             तुळशीच्या झाडाला जलदान करून अनोखे उदघाटन करण्याची डब्ल्यूसीपीएची प्रथा येथेही जोपासताना डब्ल्यूसीपीएचे ( श्रीरामपूर ) महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी प्रास्तविक करताना संस्थेचे कार्य विषद केले व लवकरच संस्थेच्या माध्यमातून जेष्ठ दिवंगत नेते मा.गोविंदराव आदिक यांच्या सर्वंकष कार्याची दखल घेवून त्यांचा फोटो असलेले टपाल तिकीट काढले जाणार असल्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसन्नकुमार धुमाळ यांनी तर आभार प्रदर्शन भाऊराव माळी यांनी केले. नगरसेवक राजेंद्र पवार, प्रा.डॉ. दादाराव माळी,
डब्ल्यूसीपीएचे सचिव भाऊराव माळी व दै. पुढारीचे श्रीरामपूर कार्यालय अधिक्षक विष्णू वाघ यांनी मनोगते व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.                    
               याप्रसंगी डब्ल्यूसीपीएचे जेष्ठ सदस्य सी.के भोसले, बाबासाहेब चेडे, भिमराज बागुल, अंबादास राऊत, शैलेंद्र भणगे तसेच राहाता पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे राजेंद्र फंड,  टपाल तिकीटाचे मानकरी सुनिल सुदामराव पवार, सौ. संगिता रामटेके, बाबासाहेब जाधव, सौ. सौजन्या क्षिरसागर, दिपक राजगुरू, कविता आटोळे, डॉ. प्रिया मुपडे, सौ. शकुंतला सारडा, भाऊराव माळे, शैलेंद्र भणगे, प्रा.डॉ. दादाराव म्हस्के, ऋषिकेश विघावे, संजय कोळेकर व डब्ल्यूसीपीएचे सदस्यत्व नव्याने मिळालेले प्रा. कैलास पवार हे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a comment