तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

मराठी ही समृद्ध आणि श्रिमंत भाषा आहे-प्रा डॉ इंजेगावकर


प्रतिनिधी
पाथरी:-मराठी भाषेला तीन हजार वर्षा पुर्वीचा इतिहास असून ती समृद्ध आणि श्रिमंत असल्याचे प्रतिपादन स्व नितिन महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा डॉ आनंद इंजेगावकर यांनी राज्य परीवहन मंडळाच्या बस स्थानकात आयोजित कवी कुसुमाग्रज यांच्या  जयंती निमित्ताने गुरूवार २७ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यक्त केले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आगारप्रमुख पी पी पानझडे हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध डॉ ल रा मानवतकर, पत्रकार किरण घुंबरे पाटील,स्थानक प्रमुख कुंडलीक बरगे यांची या वेळी मंचावर उपस्थिती होती. पुढे बोलतांना  ते म्हणाले की,मराठी ही लवचिक,चिवट,व्दयअर्थी, या लकबींनी युक्त असून ती इतर भाषां पेक्षा वेगळी आहे.  इंग्रजीच्या आक्रमणाने मराठी लयाला जाणार नसून तिच्यातील उपजत गुणां मुळे ती समृद्ध होणार आहे. मराठी भाषा बोलणा-यांनी विविध शोध लाऊन  नववव्या शब्दांची भर टाकून भाषिक दालन समृद्ध करावे असे आवाहन ही प्रा डॉ इंजेगावकर यांनी या वेळी केले. या वेळी डॉ ल रा मानवतकर, पत्रकार किरण घुंबरे पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षिय समारोप आगारप्रमुख पानझडे यांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार आगारातील वरीष्ठ लिपिक शंकर राठोड यांनी मानले. या कार्यक्रमा साठी वाहतूक नियंत्रक आणि आगरातील कर्मचारी,प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment