तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

परळीत श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- श्री विश्वकर्मा जयंती पाॅवर हाऊस समोर परळी वैजनाथ येथे उत्साहात साजरी करण्यात विश्वकर्मा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जिवनआण्णा शिंदे यांच्या निवासस्थानी जयंती साजरी करण्याआली. अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व विश्वकर्मा प्रतीमेचे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी विश्वकर्मा सेवाभावी संस्था अध्यक्ष जिवनआण्णा शिंदे, संगमच्या पोलिस पाटील पांडुरंग रोडे, विलास पवार,विश्वनाथ पवार,गंगाधर पोपळे,भारत आसेवार,ज्ञानेश्वर शिंदे, यांच्या सह अनेक मान्यवरांनी विश्वकर्मा जयंती निमित्त दर्शन घेतले व कोकाटे महाराज यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment