तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

बस स्थानक संघर्ष समितीची आमदारांनी घेतली दखल


बसस्थानक उभारण्यासाठी परिवहन मंत्र्यांना दिले निवेदन


अरुणा शर्मा


पालम :- मागील अनेक वर्षापासून तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक उभारण्याच्या मागणीला राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करण्यात आलेल्या दुर्लक्ष मुळे अद्यापही तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक नसल्याने स्थापन करण्यात आलेल्या बस्थानक संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनाची दखल आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेत परिवहन मंत्री अनिल परब यांना बसस्थानक उभारण्याची मागणी ची निवेदन दिली आहेत. तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षाचा कालखंड लोटला आहे.  तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकारात्मक धोरणामुळे आजपर्यंत याठिकाणी  बसस्थानक सारखा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही बसस्थानक नसल्याने तालुक्यातील दररोज जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणी ला समोर जावे लागते  पर्यायी प्रवाशांना जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा अवलंब करावे लागतो  प्रमुख महामार्गावरील हा तालुका असल्याने या मार्गावरील चालू असलेल्या बसेस केव्हा येतात केव्हा जातात हेच कळायला मार्ग नसतो हा रस्ता शहरातून गेल्याने पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नांदेड रात्रंदिवस वाहनांची रेलचेल कायम असते या मोठ्या शहरांना हा रस्ता जोडला जातो बसस्थानक अभावी प्रवाशांना  रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते प्रवाशाना बाहेरगावी जाण्यासाठी बस येई पर्यंत थांबण्यासाठी सहारा नसल्याने झाडाचा सहारा घेत ताटकळत उभे राहावे लागते तर नवीन आलेल्या प्रवाशांना कुठे थांबावे असा प्रश्न पडतो यामुळे तालुक्यातील  मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होत आहे प्रमुख महामार्गावरील लगत  बसस्थानक उभारण्यासाठी जागा मिळत नाहीत खासगी जागेचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे कोणी जागा तेत नाही तालुक्याची निर्मिती होऊनही पंचवीस वर्षाचा कालखंड लुटून या ठिकाणी बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शहरातील अनेक युवक एकत्र येत एक संघर्ष समिती स्थापन करीत यामध्ये संघर्ष समितीचा तालुकाध्यक्षपदी पांडुरंग रोकडे,  भैया सिरस्कर, गजानन सिरस्कर , अविनाश हनवते, विशाल रोकडे,  गजानन देशमुख, भागवत रोकडे, राहूल शिंदे, वैजनाथ पौळ, सूग्रीव पौळ, माउली घोरपडे, मंगेश घोरपडे, राज गोडसे, अब्रार काजी, अविनाश जोशी, बाबा रोकडे, अजित शिंदे, दत्तराव सिरस्कर, शिवलिंग स्वामी, यूवराज पवार, महानामा वावळे आधीच अनेक युवकांनी एकत्र येऊन संघर्ष समितीच्या माध्यमातून बस स्थानक उभारण्यासाठी मागील अनेक दिवसापासून पाठपुराव्याची दखल गंगाखेड येथील आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना एका निवेदनाद्वारे तालुक्यात बस स्थानक उभारावे अशा मागण्यांचे निवेदन दिले आहे  करण्यात आलेल्या मागणीमुळे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी आशा पल्लवित झाली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment