तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

पाथरीत शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम


प्रतिनिधी
पाथरी:- सार्वजनिक शिवजन्मोत्सव-२०२० अंतर्गत पाथरी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता वारकरी दिंडी निघणार असून या दिंडीची सुरूवात श्रीसाई जन्मस्थान मंदिर पाथरी येथून होणार आहे ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक सेलू  कॉर्णर मार्गे बाजर समिती आवारातील छत्रपतींच्या स्मारका पाशी सकाळी १० वाजता छत्रपतींना अभिवादन करून सव्वा दहा वाजता वक्तृत्व स्पर्धा,रक्तदान शिबिर  त्या नंतर अल्पोपहार .दुपारी दोन वाजता मंत्रालयात म.ग्रा.रो.ह.यो व फलेत्पादन विभागात कार्यालयीन प्रमुख म्हणून कार्यरत असलेले राज्यकर निरिक्षक अंकूश नखाते यांचे व्याख्यान होणार आहे. या वेळी १५ ते २५ वर्ष वयोगटा साठी महिला, पुरूष गटा साठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहेत यात दोन्ही गटा साठी  प्रथम आणि व्दितिय येणा-या स्पर्धकास अनुक्रमे अकरा आणि पाच हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. स्पर्धे साठी सावित्रीबाई फुले, संत तुकाराम/संत न्यानेश्वर, महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,स्वामी विविकानंद,मा. राष्ट्रपती अब्दूल कलाम,संत गाडगेबाबा हे विषय असणार आहेत.हे कार्यक्रम माध्यामिक विद्यालय देवनांद्रा येथे पार पडणार आहेत.

No comments:

Post a Comment