तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

परळीची शांतता भंग करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे वक्तव्य पोलीस अधीक्षक हर्षवर्धन पोद्दारपरळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)
          परळीची शांतता भंग करणाऱ्याची गय केली जाणार नाही असे वक्तव्य पोलीस अधीक्षक हर्षवर्धन पोद्दार यांनी केले. येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या शासकीय विश्रामगृहात मराठा, वंजारी समाजाच्या प्रमूखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हे वक्तव्य केले.
              मागील काही दिवसांपासून शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. येथील सोन्याचे व्यापारी अमर देशमुख यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे मराठा, वंजारी अशा प्रकारचा वाद निर्माण झाला आहे. यात मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात फेसबुक वर जी पोष्ट टाकली होती. त्यांच्या वर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. या कारणांमुळे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या विश्रामगृहात वंजारी, मराठा समाजाच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता.२०) दुपारी केले होते. यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले की, विनापरवाना शहर जर कोणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये. असे यावेळी पोलीस अधीक्षक म्हणाले. या बैठकीला वंजारी, मराठा समाजातील प्रमुखांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी राहूल धस, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम व संभाजी नगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment