तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

थर्मल काँट्रॅक्टर्स असोसिएशन च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटप उपक्रम ! ; मासिक बैठकीत इंजि. भगवान साकसमुद्रे यांचा सत्कारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
   बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही थर्मल काँट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटप उपक्रम राबविण्यात येणार आहे. असोसिएशन च्या मासिक बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली त्याचप्रमाणे मूकनायक पुरस्कार प्राप्त इंजि. भगवान साकसमुद्रे यांचा सत्कार करण्यात आला. 
      थर्मल काँट्रॅक्टर्स असोसिएशनच्या मासिक बैठकीचे आयोजन तिरुपती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे  यावर्षीही भाविकांना  खिचडी वाटप करण्याचा उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी पुणे  येथे मूकनायक पुरस्कार प्राप्त इंजि. भगवान साकसमुद्रे यांचा असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच स्मृतीशेष ज्ञानोबा तुकाराम मुंडे व रौफभाई या सदस्यांना असोसिएशन च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  यावेळी  असोसिएशन चे अध्यक्ष अंगद हाडबे, शेखर स्वामी, शिवाजी बिडगर, महादेव मुंडे, रमेश सरवदे, हरि बुरकुले, सुनील सानप, बालासाहेब मुंडे, बंडू गित्ते, जगदीश आहिर, टी. जी. मुंडे, प्रभू बुरकुले, दशरथ जाधव, संतोष बुरकुले, हिमंत कराड, सुरेश गोलेवार, संजय व्हावळे, शशी बिराजदार, बापु गायकवाड हरिभाऊ आगलावे, दगडू भाळे,संदिपान काळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment