तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

कै.शंकरराव कोंडिबा गित्ते यांच्या गंगापुजन कार्यक्रमानिमित्त ; अर्जुन महाराज लटपटे यांचे किर्तन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे नंदागौळ येथे आज गुरुवार, दि.27 फेब्रुवारी रोजी  ह.भ.प.अर्जुन महाराज लटपटे, भगवानबाबा संस्थान होळ यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून भाविक भक्तांनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील  कै.शंकरराव कोंडिबा गित्ते यांच्या गंगापुजनाचा कार्यक्रम । काळाने जरी हिरावले । अनंत तुमची छाया ।
नित्य स्मरते आम्हा । अनंत तुमची माया । मनी होता भोळेपणा । कधी न दाखवला मोठेपणा । अजुनही होतो भास । तुम्ही आहात जवळपास ।  मित्ती फाल्गुन शु.4 शके 1941 गुरुवार दि.27 फेब्रुवारी 2020 रोजी होणार असून त्यानिमित्त दुपारी 1 ते 3 वाजता  ह.भ.प.अर्जुन महाराज लटपटे भगवानबाबा संस्थान होळ यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून दुपारी 3 ते 6 वा. भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.

नंदागौळ येथील ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी लटपटे महाराजांचे किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी नंदागौळ येथे उपस्थित रहावे असे गणेश शंकरराव गित्ते, धनराज शंकरराव गित्ते व गित्ते परिवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment