तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

आमची लढाई देशासोबत नाही तर केंद्रशासन सोबत आहे महिलांचा एल्गार




  आम्ही छञपतीची मावळे, आम्हाला देशभक्ती शिकवु नका - शेख सुबहान अली
      महिला तिरंगा रॅलीने परळीकर भारावून गेले

 परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
      संविधान संरक्षण समिती आयोजित बेमुदत धरणे आंदोलन आज बाराव्या दिवशी इस्लामपुरा बंगला येथील महिलांनी शहरातील मुख्य मार्गावरून तिरंगा रॅली काढली हि तिरंगा रॅली संविधान संरक्षण भूमी नेहरू चौक तळ याठिकाणी सभेत रूपांतरीत झाली. या रॅलीत मुलीनी राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, साविञीमाई फुले, रमाबाई आंबेडकर, रझीया सुलताना सह विविध थोर महिलांची वेशभूषा सादर करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवीले.  यावेळेस महिलांनी केंद्र शासनाच्या संविधान विरोधाच्या सी ए ए, एन आर सी व  एन पी आर या कायद्याविरोधात आपला एल्गार केला. महिलांचा पुळका ठेवणारे देशाचे पंतप्रधान आज कुठे आहे, आज का त्यांना महिलांची चिंता वाटत नाही, आज त्याच महिला आहेत ज्या महिलांच्या नावावर त्यांनी कायदे केले, बेरोजगारी, भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या केंद्रशासनाने असे संविधान विरोधी कायदे आणून भारतीय जनतेची दिशाभूल केलेली आहे. भारतातील नागरिकांना आम्ही नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागणारे कायदे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही ला धोकादायक आहे. संविधान आज संपवण्याचा घाट काही द्विराष्ट्र संकल्पना असणारे लोक करताना दिसून येतात.  यावेळेस परळी नगरीच्या नगराध्यक्ष सरोजनीताई हालगे व अॅड. हेमाताई पिंपळे यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. जात,पंथ,धर्म या सर्वांना बगल देऊन आम्ही भारतीय असा नारा देणारा हा देश.  फार मोठी शोकांतिका आहे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत महिला रस्त्यावर उतरून केंद्र शासनाच्या विरोधात संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहे.प्रत्येकाने आंदोलन केले पाहिजे. मी अभिनंदन करते येथील महिलानचे ज्या चौकटीत होत्या त्या महिला चौकटीच्या बाहेर निघालेल्या आहेत. दिल्लीच्या शाहीन बाग पासून ते परळीच्या संविधान संरक्षण भूमी पर्यंत आज महिला बोलत आहेत,  ताकतीने या संविधानद्रोही कायद्याचा विरोध करत आहे आणि मी तुमच्या लढाईत एक महिला म्हणून खंबीरपणे सोबत आहे असे मत व्यक्त केले. इस्लामपुरा येथून महिलांनी आज भव्य दिव्य तिरंगा रॅली काढून परळीकरांची मने जिंकली. भारतीय आहोत आणि हा अधिकार आमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही असा इशारा केंद्र सरकारला या महिलांनी दिला.
   संध्यकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यान कार शिवचरित्रकार शेख सुभान अली यांनी एनआरसी, सीएए व एनपीआर कायद्याला आपल्या शैलीत केंद्र सरकारचा समाचार घेतला. केंद्र सरकारचे कार्य नागरिकांचे रक्षण करणे असून त्यांना सुरक्षा पुरविणे आहे. आज देशामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे.  प्रत्येक समाज आज एकमेकांना शंकेच्या नजरेने पाहत आहे. हा देश गांधीचा आहे, बाबासाहेबांचा आहे शहीद भगतसिंगाचा आहे. ज्या मातीत गुरुनानक, संत कबीर, संत तुकाराम, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले सारख्या महामानवाने जन्म घेतला. त्या भारत भूमीमध्ये असे संविधान द्रोही कायदे अनुण भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहेत.  आम्ही वाड्यावर जाऊ, झोपड्यात जाऊ, खेड्यापाड्यात जाऊन आमच्या सर्व बंधूंना समजून सांगू की हा कायदा फक्त मुस्लिमांसाठी नाही यामध्ये 40% हिंदू समाज भरडला जाणार आहे. आसाम मधिल यादीत 19 लाख 48 हजार लोकांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सांगण्यात आले. हिंदूनी विचार केला पाहिजे हा कायदा फक्त मुसलमानांसाठी नाही.  मनुवादी मानसिकता असलेले केंद्र शासन संविधान द्रोही कायदे करतात यांचा निषेध करतो व अशा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हा कायदा माघे घेण्यासाठी भाग पाडु. यावेळी नांदेड येथुन आलेले अॅड.अब्दुल रहमान सिद्दीकी यांनी देखील या संविधान द्रोही कायद्याची बारकाई समजून सांगितली एनआरपी हाच एनआरसी आहे, फक्त लोकांना नागरिकता देणे हे सरकारचे मनसुबा नसून भारतातील अल्पसंख्याकांना त्यांच्या हक्कापासून वंचित करणे हा हेतू आहे असे मत व्यक्त केले.


 परळीच्या इतिहासात आज पहिल्यांदाच महिलांनची प्रंचड मोठी तिरंगा रॅली निघाली, गणेशपार, अंबावेस, झी काॅनर, राणी लक्ष्मीबाई टाॅवर, देशमुख पार मार्गे संविधान संरक्षण भुमि येथे पोहचली.

No comments:

Post a comment