तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

पुणे येथे राजेंद्र लाड यांच्या " आपली माणसं " कवितेचे भरभरून कौतुक


बाळू राऊत प्रतिनिधी 
    मुंबई (पुणे) - आठवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य सांमेलन दिनांक २२ व २३ फेब्रुवारी २०२० रोजी स्वामी विरजानंद साहित्य नगरी,बालकल्याण संस्था,राजभवन शेजारी,गणेशखिंड रोड,पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून शनिवार दि.२२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता निमंत्रितांचे कवीसंमेलन पार पडले.या कवीसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांना निमंत्रण देण्यात आले होते.याप्रसंगी त्यांनी शीघ्र तयार केलेली " आपली माणसं " ही कविता सादर केली.या कवितेस पुणेकरांनी व देशभरातून आलेल्या सुप्रसिद्ध कवी मित्रांनी,दिव्यांग बंधू - भगिनींनी भरभरून दाद देत कवितेचे खुपच कौतुक केले.
    शेजारी ही आपली माणसं,पुढे ही आपली माणसं,चोहोंबाजूंनी आपलीच आपली माणसं,म्हणून म्हणतो आपल्या माणंसांसाठी कालपण,आजपण,उद़यापण,कायपण..या ओळीने सुरुवात असलेल्या आपली माणसं या कवितेला प्रचंड प्रतिसाद उपस्थित रसिक बांधवांनी दिला.
        यावेळी व्यासपिठावार कवी मित्र द.ल.वारे (बीड),शिवाजी गाडे (पैठण),मोहिद्दीन नदाफ (सोलापूर),गाडेकर डी.एच (बीड),आरती बैरागी (अहमदनगर),रघुनाथ ससाणे (लातूर),सुरेखा चिखलकर (सांगली),प्रकाश अवचर,सुरेखा पाठक (सोलापूर),जीवन टोपे (खेड) उपस्थित होते.सर्वांनी प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद देवून राजेंद्र लाड यांच्या कवितेचे भरभरून कौतुक करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   आठव्या अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनास देशभरातून अनेक सुप्रसिद्ध कवी निमंत्रित करण्यात आले होते.त्यामध्ये दिव्यांगांप्रती सदैव काम करीत असल्यामुळेच विशेष बाब म्हणून राजेंद्र लाड यांना आमंत्रित केले गेले होते.पहिल्या साहित्य संमेलनापासून आठव्या साहित्य संमेलनात राजेंद्र लाड यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिलेला आहे.यावेळी देशभरातून आलेल्या कविंनी मराठी व हिंदीतून आपल्या कविता सादर करुन राजेंद्र लाड यांच्या  "आपली माणसं " या कवितेचे विशेष कौतुक संमेलनाध्यक्षा प्रा.श्रीम.कुसुमलता मलिक (दिल्ली),उद़घाटक डाँ.दयाल सिंह पवार (उत्तराखंड),अनिल दिक्षित,रुमेश पवार (मुंबई),पीयुष कुमार द्विवेदी,सुनिल कुमार,कृष्णा कुमार,सत्येन्द्र कुमार यादव,राजेश कुमार यादव,राजू सिंह,शिवेन्द्र मिश्रा,दिलशान मेंहदी,मनोज कुमार गुप्ता,सुर्यदेव सिंह (उत्तरप्रदेश),अजय कुमार,विकास कुमार,सुरेंद्र कुमार (बिहार),हरदेव निमोदिया (राजस्थान),रफिक खा (मध्यप्रदेश),मुंकूंद शर्मा (दिल्ली) यांनी करुन आदराने राजेंद्र लाड यांना बोलवून दिव्यांगांप्रती केलेल्या कामाची माहिती घेतली व विशेष अभिनंदन करुन आम्हांलाही वेळोवेळी दिव्यांग म्हणून येणाऱ्या अडीअडचणीसाठी सदैव मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.निमंत्रित कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान नंदकुमार गुरव यांनी भूषवून सुत्रसंचलनही केले तर आभार भावना विसपुते यांनी मानले.
        यावेळी साहित्य संमेलनाचे आयोजक व नियोजक निमंत्रक बापूसाहेब बोभाटे,डाँ.रविंद्र नांदेडकर,निलेश छडवेलकर,सुहास तेंडूलकर,विजय कान्हेकर,ज्ञानेश्वर तापकीर,श्रीधर आखाडे,सुभाष मंत्री,अभय पवार,अपर्णा पानसे,भाग्यश्री मोरे,दत्ता भोसले,नंदकुमार फुले,राजेंद्र वाघचौरे,रफिक खान,संगिता जोशी,भावना विसपुते,अँड.कविता पवार,पिंटू भोसले यांनी राजेंद्र लाड यांचे कौतुक करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    याप्रसंगी राजेंद्र लाड यांनी दिव्यांग साहित्य संमेलनास उपस्थित असलेले दिव्यांग आयुक्त पुणे श्रीम.प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे दिव्यांगांच्या अनेक प्रश्नांचा उहापोह करुन महाराष्ट्रात दिव्यांग हक्क कायदा २०१६ ची कडक अंमलबजावणी व्हावी ही मागणी केली तर माजी दिव्यांग आयुक्त पुणे तथा सेवानिवृत्त सचिव,सामान्य प्रशासन मुंबई यांच्याकडे अनेक दिव्यांग प्रश्नांसंबधी सखोल चर्चा केली तसेच माजी दिव्यांग आयुक्त तथा जिल्हाधिकारी हिंगोली बालाजी मंजुळे यांच्यासमवेत मैत्रीपूर्ण दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत चर्चा करुन जेष्ठ कायदेतज्ञ मुंबई अँड.उदय वारुंजीकर यांच्याकडे अनेक दिव्यांग प्रकरणाबाबत चर्चा करुन दिव्यांग कर्मचारी यांना जूनी पेंशनचा फायदा मिळण्यासाठी आपण कायदेशीर सर्व प्रकारची मदत करावी ही मागणी करुन सर्वांनी दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेवून सर्वतोपरी मदत करु असे आश्वासन दिले आहे असे शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment