तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

सिनेट मेंबरपदी नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतिने बाजीराव धर्माधिकारी यांचा सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट मेंबर म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांचा परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतिने सत्कार करण्यात आला.
 परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट मेंबर म्हणुन नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.परळी शहरातून विद्यापीठाच्या सिनेटवर धर्माधिकारी यांच्या रुपाने पहिल्यांदाच नियुक्ती झालेली आहे.या निवडीबद्दल परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतिने पीसीएन न्यूज कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे,कार्याध्यक्ष धीरज जंगले,संपादक राजेश साबणे,पत्रकार धनंजय आढाव,प्रकाश चव्हाण,मोहन व्हावळे,महादेव शिंदे,किरण धोंड, महादेव गित्ते,अनंत कुलकर्णी,गणेश आदोडे, अभिजीत गुट्टे,बुंदेले आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment