तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 March 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या आव्हानाला परतुरकरांचा भरभरून प्रतिसाद!
४०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.....

परतूर/प्रतिनिधी

जगभर कोरोना संसर्ग पसरल्याने  शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत होता. हा भरून काढण्यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी रक्तदानाचे आव्हान करण्यात येत आहे. याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून परतूर मधील तरुण सुजाण नागरिकांनी रक्तदान करण्याचा संकल्प व्हाट्सअप्प ग्रुप वर चर्चिला आणि सर्वांचा प्रतिसाद पाहून दि.31 मार्च 2020 रोजी देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या शिबिरात एकूण 402 रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाराष्ट्राच्या  इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान केले जात  आहे.
यावेळी सामाजिक अंतराचा नियम पाळून, कलम 144 चा भंग न पावता व ऐतिहासिक संख्या असलेले रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले.
ऑनलाईन नोंदणी चा भरघोस प्रतिसाद पाहून प्रथमच आयोजकांनी अमृता ब्लड बँक,श्री स्वामी समर्थ ब्लड बँक आणि आदर्श ब्लड बँक अश्या तीन ब्लड बँक माध्यमातून  व्यवस्था केली होती. परिणामी एका वेळेला अनेक दात्यांना कमी वेळेत रक्तदान करता आले.
शिबिरादरम्यान सर्व परिसर, हॉल व प्रत्येक बेड वेळोवेळी निर्जंतुक करून सर्व वैद्यकीय,शासकीय, प्रशासकीय नियम पाळून व सर्वांची सर्व प्रकारची काळजी घेऊन शिबिर करण्यात आले.
सदर शिबिराचे उदघाटन  माजी मंत्री नामदार श्री बबनराव लोणीकर,यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार श्री सुरेशकुमार जेथलिया, नगराध्यक्षा सौ. विमलताई जेथलिया,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री राहुल लोणीकर,कृषी उत्पन्न बाजार समिती परतूर चे अध्यक्ष श्री कपिल आकात यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले.
दरम्यान स्वयंस्फूर्तीने श्री राहुल भैया लोणीकर व सौ विमलताई जेथलिया यांनी सुद्धा सामाजिक भान जाणून स्वतः रक्तदान केले व सर्व तरुणांना रक्तदानाचे आव्हान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्रशासकीयस्तरावरुन उपविभागीय अधिकारी श्री भाऊसाहेब जाधव , वैद्यकीय अधिकारी श्री ज्ञानदेव नवल तसेच पोलीस प्रशासक श्री निलेश तांबे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. 
संजय दिनकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून परतूर येथील सर्व सुजाण नागरिकांनी आयोजित केलेल्या या शिबिरासाठी अशोक तनपुरे,संदीप दाभाडे,श्याम बरकुले,संदीप जगताप,सुबोध चव्हाण,गणेश गाडेकर,सौरभ बगडीया,स्वप्नील भंडारी,सावता काळे, संतोष चव्हाण , डॉ. भानुदास कदम, डॉ संदीप चव्हाण, डॉ.आनंद तनपुरे, ऍड.राजेश अंभुरे,प्रा.पांडुरंग नवल,विनायक भिसे,राजेश भुजबळ,बाबा गाडगे, कृष्णा आरगडे, अनिल अग्रवाल, योगेश बरीदे, आशिष धुमाळ, अशोक गारकर,अथर शेख,भारत सवणे, सय्यद वाजेद,श्यामसुंदर चित्तोडा,नारायण मुंदडा,राजू कार्लेकर, उमाकांत ठाकरे , अमित जवळेकर, अनिल बाचेवाड,  महेश काळे , अशोक केजडीवाल, ओम कानडे, भाऊसाहेब मुके,सचिन चव्हाण , दीपक जांगिड, शंकर चव्हाळ ,  संदीप पाचारे , भानुदास टीपरकर , संदीप मथूरे,  अश्विन गुंजकर, रघुनंदन नवल, यांच्यासह संयोजन समितीतील अनेक  समाजसेवकांनी व्यवस्थित नियोजन करून शिबिर अंमलबजावणीसह  यशस्वी पार  पाडले!

कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक


औरंगाबाद, (प्रतिनिधी) :-  दि. 31 - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मराठवाडा विभागामध्‍ये सर्व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोरोनाबाबत माहिती व समस्या निवारणासाठी संपर्काकरीता नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय  0240- 2331077,  बीड जिल्हाधिकारी कार्यालय 02442-222604, परभणी जिल्हाधिकारी कार्यालय 02452-226400,  हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय 02456-222560, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय 02382-246803,  नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय 02462-235077,  उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय  02472-225618, जालना जिल्हाधिकारी कार्यालय 02482- 223132.  तरी आपल्याला कोरोना संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी वरील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची विटभट्ट्यांवर धडक कारवाई ; सिरसाळा येथे तीन विटभट्टी मालकांविरोधात गुन्हा दाखलपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उद्योग, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही विटभट्टी चालू ठेवल्याबद्दल तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सिरसाळा येथे विटभट्टी चालकाविरुद्ध धडक कारवाई करीत तिघांविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         सध्या कोरोनामुळे नागरीक परेशान आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्य़ातील सर्व उद्योग, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही सिरसाळा परिसरात विटभट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी थेट विटभट्टीवर जाऊन पाहणी केली असता शेख नजीब शेख नासेर, सय्युम पठाण मुहम्मद पठाण, रामेश्वर नारायण चव्हाण सर्व रा. सिरसाळा यांच्या विटभट्ट्या चालू असल्याचे निदर्शनास आले.
       यावरून सिरसाळाचे तलाठी युवराज सोळंके यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय मुंडेंचा परळीकरांसाठी आणखी एक निर्णय; डाबीसह आता दाऊतपुरवरूनही होणार वीजपुरवठा विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ना. मुंडेंनी केले कौतुक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) (दि.३१) ----: परळी शहराला वीजपुरवठा करणाऱ्या डाबी येथील १३२ केव्ही सबस्टेशन मध्ये काही फॉल्ट झाला की परळी शहर अंधारात असायचं! परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आता यावर पर्यायी उपाय काढला आहे.

आता परळी शहरासाठी सिमेंट फॅक्टरीकडे येणारी दाऊतपूर ३३ के.व्ही. वीज लाईन कालरात्री देवी सबस्टेशनला जोडण्यात येणार आहे.

यामुळे डाबी सबस्टेशनला आता पर्यायी व्यवस्था होणार असून, डाबी कडील वीज पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाला तरी परळीकरांना अखंडित वीज मिळणार आहे.

याबाबत ना. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आज (दि.३१) बीड महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सरग व अंबेजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेशी यांनी या कामाची पाहणी केली यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता जिलानी व कटके हेही उपस्थित होते.

सध्या परळी शहराला डाबी १३२ केव्ही या एकाच सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. या सबस्टेशनला काही अडथळा निर्माण झाला तर परळी शहरात वीज पुरवठा करण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्था नाही. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून लवकरच ही व्यवस्था होणार असून, त्यानंतर दोन्ही पैकी एकही फीडरचा वीज पुरवठा खंडित झाला तर दुसऱ्या पर्यायी व्यवस्थेमुळे परळीकरांना अंधारात राहावे लागणार नाही.

या कामाला लवकरच सुरुवात होत असून युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याबाबत सूचना अधीक्षक अभियंता सरग यांनी परळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

*विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मुंडेंनी केले कौतुक*

दरम्यान गेल्या तीन - चार दिवसात परळीसह परिसरात सातत्याने होत असलेल्या वादळी वारा व पावसाने अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा तुटून अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झाला. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करत लॉकडाऊन सह कोरोनाच्या या कठीण काळातही काही वेळातच वीज पुरवठा पुन्हा नियमित केला. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ना. धनंजय मुंडे यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच दाऊतपूर ३३ के.व्ही. लाईन मार्फत पर्यायी वीज पुरवठा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल असा विश्वासही ना. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात;


शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते  75 टक्केच वेतन
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली  घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

केद्राकडून 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत मिळावी; उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र


 ‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने
25 हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 31 :- राज्यावर आलेलं ‘कोरोना’चं संकट, ‘टाळाबंदी’मुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था, राज्यउत्पन्नात सातत्याने होत आलेली घट या पार्श्वभूमीवर आगामी काळात ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकाने महाराष्ट्राला 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजममंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारमधील राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राकडून राज्याला येणे असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, ती 31 मार्चपर्यंत देण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.
आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत केंद्राकडून येणे असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी मिळावी तसेच ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. राज्याची आर्थिक स्थिती व राज्यासमोरील आव्हानांची माहिती त्या पत्रात दिली आहे. केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात तीन आठवड्यांची टाळाबंदी जाहीर केली आहे. या टाळाबंदीमुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प आहे. त्याचा राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असते. परंतु ‘कोरोना’ आणि टाळाबंदीमुळे राज्याचे उत्पन्न जवळपास थांबले आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.  त्यातच केंद्र सरकारकडून केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे 1687 कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे 14 हजार 967 कोटी रुपये अशी एकूण 16 हजार 654 कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत राज्याला मिळावी तसेच ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी  25 हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूचं अजब लग्न गजब खेळ !


            सद्यस्थितीत कोविड-१९ म्हणजे कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर दहशत पसरवली आहे. संपूर्ण जग अक्षरशः जागेवर थांबले आहे. सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगातील प्रत्येक व्यवहार बंद आहेत. अनेक देशांनी आपापल्या नागरीकांना कोरोनाच्या जंजाळापासून वाचण्यासाठी घरातच थांबण्याचे फर्मान काढले आहे. अशात सर्व प्रकारचे क्रिडा प्रकारही बंद आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने तर सहा महिने आपल्या देशातील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे खेळाडूही आपापल्या घरात बंदिस्त आहेत. त्यातील बरेचसे घरातच व्यायाम, प्रॅक्टीस व खेळाचा अभ्यास करत आहे. 
                     या क्वारंटाईनच्या काळात ऑस्ट्रेलियाची अव्वल दर्जाची महिला जलदगती गोलंदाज मॅगन शट हिने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस सोमवारी ३० मार्चला साजरा केला. मॅगनच्या लग्नाची कहाणी ऐकल्या नंतर आपल्याही पायाखालची जमीन हलेल. ३o मार्च २०१९ रोजी म्हणजे वर्षभरापूर्वी तिने विवाह केला. पण तो मात्र कुणा पुरुषाशी नाही तर एका महिलेशी !म्हणजे समलिंगी विवाह !!    
                    हो बरोबर आहे मागच्याच वर्षी ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या देशात समलिंगी विवाह कायदा संमत केला आणि त्याची अंमलबजावणी करणारी पहिली क्रिकेटपटू ठरली मॅगन शट. आपली समलैंगिक पार्टनर जेस होलियाक सोबत तिने आपला अजब संसार थाटला.
                 ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड कडून खेळणारी जलदगती महिला गोलंदाज मॅगन शट नुकत्याच ऑस्ट्रेलियात संपन्न झालेल्या महिलांच्या टि२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाची निव्वळ सदस्यच नव्हती, तर अंतिम फेरीत भारताला हरवून ऑस्ट्रेलियाला विक्रमी विजेतेपद मिळवून देण्यात अग्रेसर होती. स्पर्धेत सर्वाधिक १३ बळी मिळवून तिने स्वतःचे अस्तित्वही क्रिकेट जगताला दाखवून दिले आहे.
                इतकेच नाही तर मॅगनच्या नावावर सफेद चेंडूच्या क्रिकेटमध्ये दोन हॅट्रीक घेण्याचा विश्वविक्रमही आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडूही बनली.
                 मार्च २०१९ मध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर भारताविरूध्द टि२o सामन्यात मॅगनने हॅट्रीक करून भारतीय संघाची दाणादाण उडविली होती. त्या सामन्यात २६ वर्षीय मॅगनने सलीमीवीर स्मृती मंधाना, कर्णधार मिताली राज, व दिप्ती शर्मा यांना सलग तिन चेंडूवर डग आऊटमध्ये धाडून स्वतःची पहिली हॅट्रीक साधली होती.
               विश्वचषकापूर्वी झालेल्या विंडीज विरुद्धच्या तिसऱ्या एक दिवशीय सामन्यात विडींजच्या डावाच्या शेवटच्या तीन चेंडूवर चिनेल हेन्री (३९ धावा ), करिश्मा रामहरक शुन्य व एफी फ्लेचर ( तीन धावा ) यांना सलग बाद करून आपली दुसरी हॅट्रीक साधली.
                मॅगन शट हि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील महत्वाची घटक असून आपल्या खेळाने ती संघाला मदत करत असून स्वतःच्या वैयक्तीक जीवनात कायद्याने समलिंगी विवाह करून आपल्या सहचारीणीसह आनंदाने जीवन जगत आहे. तिच्या भावी वाटचालीस आपणही शुभेच्छांचा वर्षाव करून तिच्या क्रिकेटमधील जोरदार कामगिरी बद्दल अभिनंदन करूया !

लेखक : - 
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या व इतर विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करून दिला मदतीचा हात सामाजिक संघटना, महेश बडे व अनिलकुमार गित्ते यांचा स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक


पुणे (प्रतिनिधी) :- देशातसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनच्या परिस्थिती अडकलेल्या राज्यभरातुन पुणे येथे आलेल्या स्पर्धा परीक्षेचा तयारी करण्यासाठी आलेल्या व इतर विद्यार्थ्यांसाठी सामाजिक संघटना व हाँटेल मराठवाडा वतीने दोन वेळेचे जेवन मोफत वाटप करण्यात येत आहे. अनिल गित्ते व इतरांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना मदत करून मदतीचा हात दिला आहे. या सर्व टीमचे कार्याचे सर्वत्र कौतुकास्पद अभिनंदन होत आहे.
           कोरोनाच्या या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पुणे शहरामध्ये या विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या सर्व टीमच्या ही बाब निर्देशनास आले. त्यांनी आपुलकी म्हणून मराठवाडा खानावळीच्या माध्यमातून दोन वेळेसचे जेवण उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना सहारा मिळाला आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून हा उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन मदतीचा हात दिला असल्याची माहिती महेश. बडे व परळीचे अनिलकुमार गित्ते यांनी दिली.
       देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकवीस दिवसाचा लाँकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. संचारबंदी असल्याने संपूर्ण शहर कडकडीत बंद आहेत.  पुण्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अडकलेले आहेत. यांच्यासाठी दोन वेळेसच्या  जेवणाची मोफत व्यवस्था सामाजिक संघटना व हाँटेल मराठवाडा यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये दररोज सकाळी 12.30. ते 1.30.तर.संध्याकाळी 8 ते 9 या वेळेत नारायण पेठ, शनिवार पेठ, एबीसी चौक मंडई, ज्ञानप्रबोधनी, सिंहगड रोड, कर्वेनगर, गांजवे चौक,  दत्तवाडी, धनकवडी, लोकमान्य नगर, नवी पेठ, शुक्रवार पेठ, डेक्कन, गोखलेनगर, सहकार नगर, पर्वती, शिवाजी नगर, गावठाण, वाडगावधारी, वारजे माळवाडी , येरवाडा, वाघोली या ठिकाणी वेळेत मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्पर्धा. परीक्षेचा तयारी करणाऱ्या व इतर विद्यार्थीसाठी दोन वेळेसच्या जेवणाची मोफत व्यवस्था केली आहे. महेश बडे व अनिलकुमार गित्ते यांनी सामाजिक संघटना व हाँटेल मराठवाडा या माध्यमातून स्तुत्य उपक्रम  राबविल्यामुळे विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे. अशा उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी केल्या उपक्रमाचे कार्य कौतुकास्पद असल्याने अनेकांनी कौतुक केले. याचे खूप समाधान वाटत आहे.

यंदा लोकांना नाही तर कोरोना व्हायरसला एप्रिल फुल करायचे - दत्ता विघावे


श्रीरामपूर : - सध्या सर्व जगभरत कोविड-१९ ( कोरोना व्हायरस ) ने धुडगुस घातला असून सर्व जगभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रत्येक देशांचे सरकारे हवालदिल झाले आहेत. प्रशासन सर्व पातळीवर कोरोनाचा नायनाट करण्याचा प्रयत्न असून जनता हवी तितकी प्रशासनास सहकार्य करत नाही.
               त्याच पार्श्वभूमिवर एक एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभर " एप्रिल फुल " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या जवळच्या लोकांना फुल ( मुर्ख ) बनविण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. त्यामुळे तात्पुरती करमणुक होती खरी परंतु त्याचा दुरगामी त्रासही होऊ शकतो. त्यातच सध्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने समाजात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे कोविड-१९ चा एप्रिल फुल बनविण्यात कोणीही वापर करू नये. अथवा समाजात गैरसमज तयार होईल अश्या अफवा पसरवू नये, असे आवाहन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघाचे श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे.
                 एप्रिल फुल हा करमणुकीचा खेळ खेळताना समोरच्याला गुगली टाकण्याच्या नादात तुम्हीच बोल्ड व्हाल असा इशाराही विघावे यांनी दिला असून सरकार व प्रशासन जे आदेश देतील त्याचे निमूट पालन करून प्रत्येकाने घरातच थांबावे व प्रलंयकारी कोविड-१९ लाच एप्रिल फुल करावे. असेही दत्ता विघावे यांनी पत्रकात नमूद केले आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी आपल्या निकटवर्तीयांना नाही तर कोरोना व्हायरसला एप्रिल फुल करू या अशी भावनीक सादही दत्ता विघावे यांनी सर्व जनतेला घातली आहे

अखेर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाशिम जिल्ह्यात पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी मास्कचे वाटप


 पोलिस अधिक्षकांचा पुढाकार

फुलचंद भगत यांनी केली होती मागणी

वाशिम-(फुलचंद भगत)- कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करन्यासाठी सगळेकडे संचारबंदी असतांना जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही आता असुरक्षितता वाटत आहे त्यामुळे प्रशासनाने पोलिसांनाही सुरक्षा किट ऊपलब्ध करुन देन्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी व्यक्त केले होते.वाशिमचे पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतुन ४००० कापडी मास्क तयार करन्यासाठी दिले असुन पहिल्या टप्य्यात पोलिस अधिक्षक कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच कारंजा येथील चार पोलिस स्टेशनमधील कर्मचारी व पोलिस ऊपविभागिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे या मास्कचे वाटप करन्यात आले आहे आणी दुसर्‍या टप्प्यात  हे मास्क तयार होताच मंगरुळपीर व वाशिम तालुक्यातील पोलिस कर्मचार्‍यांना मास्कचे वितरण करन्यात येणार आहे.
      महाराष्ट्रसह संपूर्ण जगात कोरोना सारख्या महाभयंकर साथीने थैमान घातले असताना ज्यांच्या विश्वासावर हे युद्ध लढले जात आहे ते म्हणजे पोलीस प्रशासन मात्र असुविधांच्या अभावावर काम करताना दिसून येत होते. पोलिसांच्या सुरक्षेसाठी कोरोना किट, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, मास्क, हे नसल्यामुळे पोलीस खातच चौदातास,बारातास ऑनड्युटी करून ज्या वेळेस  घरी जातो. त्यावेळेस पोलिसांच्या फॅमिलीलाही कोरोना आजाराची लागन होन्याची शक्यता नाकारता येत नाही.शासन स्तरावरून हे किट उपलब्ध न झाल्यामुळे पोलीस खात्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.जर कोरोना बाधित रुग्ण पोलिसांच्या संपर्कात आला तर पोलिसांना व पोलिसांच्या परिवाराला कोरोना शक्यता नाकारता येत नाही.वाशिम जिल्ह्यामध्ये  अधिकारी व  कर्मचारी रात्रंदिवस काम पाहतात. परंतु प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना कीट देण्यात आलेले नसल्याचे पोलिसांची सुरक्षितता जोपासावी अशी मागणी करन्यात आली होती.तरी शासन स्तरावर पोलिसांच्या सुरक्षेसाठी कोरोना किट, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, मास्क, हे पोलीस खात्यास उपलब्ध करून देण्यात यावं. जेणेकरून कोरोना सारखे व्हायरस विषाणूपासून पोलिसांचे रक्षण होईल.ज्या पद्धतीने नागरिकांना कोरोना सारख्या भयानक विषाणू बाबत उपाय योजना करण्यासाठी प्रशासन सांगत आहे. त्याच पद्धतीने पोलीस बांधवांसाठी विविध सामाजिक संस्था, तसेच शासन स्तरावर उपलब्ध करून देण्यात यावे.एरवी राजकीय ,सामाजिक संस्था,सामाजिक संघटना पूढे असतात मात्र आत्ता चालू घडीला कोणीच पुढे नाही…? राजकीय तसेच सामाजिक संस्थेने अशा किट उपलब्ध करून देऊन पोलीस खात्यास सहकार्य करावे. जनतेच्या रक्षणासाठी पोलीस आहेत. सर्वांनी काळजी घेऊया, कोरोना सारख्या भयानक रोगावर पोलीस खात्याच्या व आरोग्य खात्याच्या मदतीने मात करूया…..
विषाणू खूप छोटा आहे ,मात्र त्याचा प्रभाव खूप मोठा आहे.वाशिममध्ये पोलिसांना मास्कचे वाटप करन्यात आले असुन ईतर सुरक्षात्मक ऊपाययोजनाही मार्गी लावाव्यात जेणेकरुन पोलिस विभाग सुरक्षितपणे आपले कर्तव्य बजावतील.
प्रत्येक जण आपली खबरदारी घेऊया, घेऊन स्वतःची काळजी ,कोरोना आजाराला हरवूया हे शक्य होईल सर्वांच्या सहकार्याने आणी घ्यावयाच्या खबरदारीने.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

पालम पोलीस स्टे.चे ए.पी.आय. सचिन इंगेवाड यांनी केले गरीबाना राशन वाटप
आरूणा शर्मा


पालम :- शहरापासून एक किलोमीटर अंतरावर गरीब कुटूंबिय पालात राहणारे व बाहेरगावाहून आलेली 5 ते 7 कुटुंबे आपल्या लहान लहान मुलासह राहत होते त्यांना राशन पाणी जेवणाची व्यवस्था नसल्याची माहिती समजताच पालम पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगेवाड यांनी त्यांच्या पालाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटूंबियाना राशन वाटप करण्यात आले आहे. यावेळी तांदूळ, तेल, भाजीपाला त्यांना वाटण्यात आला व त्यांना कोरोना आजारा विषयी माहिती दिली व सुरक्षितता बाळगण्याचे सांगितले व आपल्याला कोणत्या गोष्टीची अडचण आल्यास पोलीस स्टेशन पालम येथे संपर्क करावा असे सांगण्यात आले.

ग्रा.पं.वाडी खु येथे प्रादुर्भाव रोकन्या साठी गावात फवारणी


आरूणा शर्मा

पालम :- तालुक्यात दि. 31 मार्च रोजी वाडी (खु) येथे ग्रा.पं च्या वतीने फवारणी करण्यात आली सध्या कोरोना व्हायरसने जगात थैयमान घातले आहे त्यामुळे गावात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये या साठी वाडी खु.येथे  सार्वजनिक ठिकाणी व प्रत्येक नागरीकाच्या घरोघरी  फवारणी करण्यात आली या वेळी गजु भाऊ भस्के, ग्रा.पं सदस्य कैरव मोरताटे सरपंच, उत्तमरावजी भस्के, आबासाहेब भस्के, भागवत भस्के, परमेश्वर भस्के, बालाजी भस्के, परसराम भस्के, शरद भस्के, देविदास भस्के, माधवराव भस्के, लक्ष्मीकांत भस्के, संजय भस्के, कांतराम भस्के, रमेश भस्के, राजेभाऊ भस्के तसेच गजु भस्के यानी आव्हाण केले कि  नागरिकांनी घरात बसावे व सहकार्य करावे.

स्थलांतरीत कामगार, बेघरांना सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना


‘आपत्ती निधी’ तून खर्च करण्यास मान्यता

राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमांवर स्थलांतरीतांचे अलगीकरण करण्याचे निर्देश

मुंबई, दि. 31:

कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनची उपाययोजना केल्यामुळे राज्यात परराज्यातील प्रवाशी, स्थलांतरीत कामगार, बेघर व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी येणारा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च करण्यासाठी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे. काही प्रवाशी, स्थलांतरीत कामगार, बेघर मंडळी महाराष्ट्रात परतत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या आणि जिल्ह्यांच्या सीमेवर अशा व्यक्तींसाठी अलगीकरणाची सोय करतानांचा त्यांना तेथेच आवश्यक त्या सुविधा, वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या काही विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यासाठी सर्व जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (एसडीआरएफ) ४५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीमधून बेघर, स्थलांतरीत कामगार यांना आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्र शासनाने देखील एसडीआरएफचा निधी अशा कामांसाठी वापरण्याची परवानगी राज्याला दिली असून केंद्राच्या आपत्ती निवारणाचे सहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून हा निधी वापरण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या सीमेवर किंवा जिल्ह्यातील सीमेवर स्थलांतरीत कामगार बेघर व्यक्ती व्यक्ती मिळेल त्या वाहनाने, पायी येत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी  त्यांना त्याठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अलगीकरण (क्वारंनटाईन) मध्ये ठेवावे. तेथे त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.
अशा व्यक्तींना महसुल विभागाने दिलेल्या वास्तव्याच्या ठिकाणी आणल्यानंतर तेथील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची आरोग्य तपासणी आणि आवश्यकतेनुसार उपचार केले जातील. यामध्ये गरोदर महिला आणि बालकांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. ५०० पेक्षा जास्त प्रवासी जर एखाद्या ठिकाणी असतील तर तेथे २४ तास बहुविध आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचनाही राज्य शासनाने दिल्या आहेत
००००


जमील पठाण
8805381333

_बुलडाणा येथील 'त्या' मृतकाच्या परिवरातीलच आणखी 2 कोरोना पाॅझिटिव्हअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे._

बुलढाणा:- 31

 येथे रविवार 28 मार्च रोजी मिर्झा नगर परिसरातील एका 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्याच्या घशातील स्वॅबचे नमुना नागपूर येथील मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. तो पॉझिटीव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने त्या कुटुंबासह परिसरातील 60 व्यक्तींना तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात आणले. पहिल्या दिवशी रात्री 60 पैकी 24 तर दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा आठ नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले, त्या एकूण 32 नमुन्यांपैकी सोमवार 30 मार्च रोजी सायंकाळी 20 नमुन्यांचे रिपोर्ट  निगेटिव्ह आले होते.. तशी ही दिलासादायक बातमी असतानाच आज मंगळवार 31 मार्च रोजी सकाळी पुन्हा त्यातली 3 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले व त्यातील 2 पॉझिटिव आले. अजुन 9 नमुन्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. जे कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यातील एक 65 वर्षीय इसम व एक 12 वर्षीय मुलगी असल्याचे समजते.

जमील पठाण 
8805381333

श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे गोसावी समाजातील म्हसणजोगी भटके विमुक्त निराधार कुटूंबियांना शिधा वाटप


परळी वैजनाथ(प्रातिनिधी) :- दि.३० - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊन केले गेलेले आहे.यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आपल्या उदर निर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.प्रशासन वेगवेगळ्या स्तरावर अशा नागरिकांसाठी प्रयत्न करत आहे.यासाठी देशभरातील देवस्थाने,सामजिक संस्था मदतीचा हात देऊ लागल्या आहेत.श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टतर्फ़े तालुक्यातील गोसावी समाजातील म्हसणजोगी भटके विमुक्त निराधार कुटूंबियांना त्यांच्या कुटूंबाला साधारण पंधरा दिवस जाईल एवढ्या शिध्याचे वितरण केले जाणार आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे तालुक्यातील ५०० निराधार कुटूंबाना बंदच्या काळात पुरेल इतका शिधा देण्यात येणार आहे.याची सुरवात आज सिरसाळा येथील शिधा पत्रिका नसलेल्या गोसावी समाजातील म्हसनजोगी भटके विमुक्त निराधार कुटूंबाना वाटप करून करण्यात आली.या मध्ये १० किलो गव्हाचे पीठ,५ किलो तांदूळ,२किलो तुरीची डाळ,१किलो खाद्य तेल,१ किलो मीठ,२०० ग्राम तिखट,५० ग्राम हळद या स्वयंपाकघरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा समावेश असलेल्या एका बॅगेत बंद करून देण्यात आले.

श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार डॉ.विपीन पाटील,वैजनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सह्यायक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, किरवले,देवस्थान चे सेवेकरी श्रीपाद कुलकर्णी,बालासाहेब सावंत यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास या बॅगांचे वाटप सिरसाळा येथे ५१ कुटूंबाना करण्यात आले.शिधा पत्रिका नसल्याने गोसावी समाजातील म्हसणजोगी भटके विमुक्त निराधार कुटूंबियांनाच तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांनी ट्रस्टला सूचना केल्या त्यानुसारच हा शिधा वाटप केला जाणार आहे.श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या सर्वानुमते हा उपक्रम राबविला जात आहे.

मास्क चे मोफत वाटपडोणगांव :- 31
 येथे सर्व धर्म संभाव माननारे व युवा नेते व भावी मेंबर सोहेल शेख रब्बानी यांच्या तर्फे डोणगांव येथील वार्ड नंबर 2 मध्ये कोरोना या रोगा पासून बचाव होण्या साठी गरीब व गरजू लोकांना माजी सरपंच व  विद्यमान उपसरपंच जुबेरखान यांच्या हस्ते मास्क चे वाटप केले या वेळी लोकांना घरातच राहण्याचे व जर काही अर्जंट काम असेल तरच बाहेर जा परंतु जाताना तोंडावर मास्क लावून बाहेर जान्यास सांगितले या वेळी इमरान खान, सद्दाम शेख, वसीम मॅकेनिकल, कुरशीद मॅकेनिकल, आलीमखा, आरशद शहा, समीर शेख, अनिस पठाण, बबलू मिस्र हे उपस्थित होते

तळेगावसह परिसरात अवकाळी पाऊस व गारपीठीची पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- भागवत मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तळेगाव व
परिसरात वादळी वार्‍यासह अवकाळी गारांच्या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे  शेतकरी उद्धवस्त झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍याच्या घामाचे हिसकावून घेतल्याने प्रशासनाने तात्काळ सदरील पंचनामे करून सरकारने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांनी केली आहे. कोरोना कहर असतांना 
21 दिवसाच्या कडेकोट लॉकडाऊनसमोर वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी संकटात सापडला आहे.

     परळी तालुक्यातील तळेगाव, टोकवाडी, लिंबोटा, पांगरी या गावासह अनेक गावात सोमवार दि.30 मार्च रोजी 6.44 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह अवकाळी गारांचा पाऊस झाला.या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, जवस, ऊस, पालेभाज्या व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी निघालेल्या पिकांचे खळे चालू होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान मोठे असून यामुळे शेतकरी उद्धवस्त आणि  हवालदिल झाला आहे.खरीपाने शेतकर्‍यांना साथ दिली नव्हती. परंतु,एका पावसाने रब्बीचे पिक जोमात आले होते.परंतु,अवकाळी पावसाने शेतकर्‍याच्या घामाचे हिसकावून घेतल्याने.शेतकरी मेटाकुटीला आला आहे.  तसेच अवकाळी पावसामुळे डाळीबाची फुलगळ, फळगळ झाली आहे. तर द्राक्षांची काढणी अंतिम टप्यात असून झालेल्या पावसामुळे मण्यांना तडे गेले. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.  पावसामुळे रब्बी पिके जमिनोदोस्त झाली आहेत. काढणीला आलेली पिके हातची गेल्याने शेतकर्‍यांमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. गतवर्षी रब्बीची पेरणी नव्हती यावर्षी आगात नाही.तरीही एका पावसाने कसे बसे आलेले रब्बीचे पिक निसर्गाच्या अवकृपेने अवकाळी पावसाने हिरावून नेले. गारांचे मोठे ढिगारे शेतात दिसून येत आहेत. हातातोंडाशी आलेली पीके पदरात पडतात की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. तसेच या जोरदार वादळात ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी घराचे पत्रे, शेतातील आखाड्यावरील पत्रे , बैलगाडीसह व साहित्य उडून गेले. काही शेतकरी जखमी झाल्या आहेत.ग्रामीण भागातील बऱ्याच गावांमध्ये घराचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या वीजवाहक तारा तुटल्याने विजेचा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहेत. या जोडण्याचे काम परळी वीज महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर चालू आहे.

  एकीकडे ‘कोरोना’चे सावट आणि दुसरीकडे अवकाळी- चे संकट. कोरोनाशी युद्धपातळीवर  रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यात शेतकऱ्यांपुढे पण लहरी निसर्गाला रोखणार कसे हा प्रश्न आहेच. अवकाळीचे शुक्लकाष्ठ महाराष्ट्राच्या मागे काही वर्षांपासूनच लागले आहे. त्याचीच पुनरावृत्ती गारपिटीसह झाली. राज्यातील सत्ताधारी संवेदनशील आहेत. अस्मानी आणि सुलतानीच्या संकटातून शेतकऱयांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. अवकाळीच्या तडाख्याने रब्बीही हिरावून घेतलेल्या बळीराजाला उभे करावे लागेल. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्याला धीर देण्यासाठी सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरकारने  नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

सेनगाव तालुक्यातील पिंपरीलिंग येथे रानडुक्कराच्या हल्यात तीन महिला व एक पुरुष गंभीर जखमी


साखरा .प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

 सेनगांव तालुक्यातील पिंपरी लिंग येथे
रानडुकराच्या हल्ल्यात तिन महिला व एक पूरूष गंंभीर जखमी उपचारासाठी नांदेड येथे
:एकिकडे कोरोणाचे संकट तर एकिकडे निसर्ग अवकाळी पावसाचे आस्मानी संकट शेतकर्यांचेमूळावर ऊठले आहे
तालूक्यात सद्या  हळद, गहू, हरभरा, काढणीला वेग आला असून शेतकरी दिवसभर शेतात काम करतात 
याच कोरोणा संकटाच्या पार्श्वभूमीवर सेनगाव तालुक्यातील पिंपरी लिंग,येथील 
 सोमवार रोजी दूपारी शेतमजूर शेतात गहू जमा करत असताना अचानक रानडुक्करांनी चार शेतमजूर तिन महिला व एक पूरूषावर हल्ला चढविला.
एकच धावपळ उडाली
यात तिन्ही महिला किरकोळ जखमी झाले तर एक पूरूष साहेबराव पोले हे गंभीर जखमी झाले असून यांना नांदेड येथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
 चतूराबाई कोकरे,सागर खरात,अण्णपूर्णा पोले, व साहेबराव पोले, यांची मांडीला चावा घेतल्याने ते गंभीर अवस्थेत नांदेड येथे हलविण्यात आले आहेतेजः न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

जागतीक जैवीक महामारीच्या काळात वीर सावरकर विचारमंच परभणी ही संस्था धाऊन आली भुकेलेल्या लोकांसाठी.
परभणी- वीर सावरकर विचारमंच च्या वतीने परभणी शहरातील विविध भागा ज्यांना जेवन्याची व्यवस्था नाही अशा भुकेलेल्या जिवासाठी वीर सावरकर विचारमंच च्या वतीने भोजनाची व्यवस्था केली आहे. उदा...रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड, झोपडपट्टी, रस्ते वरचे भिक्षुक इत्यादी लोकांना जेवन घेऊन आली वीर सावरकर विचार मंच ही संस्था. 
या संस्थेत सदस्य म्हणून व सेवेकरी म्हणून काम करताना रेणुका नगरी चे रहिवासी....मा.श्री सचिनजी सरदेशपांडे,सौ.सरदेशपांडे मॅडम, श्री मल्लीकार्जुन मीटकरी, अॅड.विलासराव काळे, किशोर भोसले, गणेशराव हांडे, प्रतापराव देशमुख, रामराव देशमुख, शंकरराव आबुज इत्यादी...विचार मंच

पोलिस दल आणी आरोग्य विभाग यांच्या पगारात कपात नकोसामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी

पोलिस आणी आरोग्य कर्मचारी जिव धोक्यात घालुन बजावत आहेत कर्तव्य

वाशिम(फुलचंद भगत)-नुकताच मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी अन् शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करन्याचा राज्य सरकारने मोठा निर्णयघेतला असुन हा निर्णय स्वागतार्हर्य नक्कीच आहे परंतु आपल्या कुटुंबाचीही पर्वा न करता जीवावर ऊध्दार होवुन,आणी जीव धोक्यात घालुन पोलिस दल आणी आरोग्य विभाग हे आपले कर्तव्य बजावत आहेत,२४ तास आपली ड्युटी बजावुन हे विभाग लोकांसाठी झटत असलेले दिसत आहेत.त्यामुळे या दोन विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात राज्यशासनाने कुठलीही कपात करु नये अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रसिध्दी पञकाच्या माध्यमातुन प्रशासनाकडे केली आहे.
      कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २३० पर्यंत पोहचला आहे. गेल्या १५ दिवसांहून राज्यात लॉकडाऊन असल्याने आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचा पाहायला मिळत आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं उप मुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले.तसेच राज्यातील 'अ' आणि 'ब' वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे.'क' वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. 'ड' वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.कोरोनाचं संकट आणि 'टाळाबंदी'मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच 'कोरोना'विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.हा निर्णय योग्य असला तरी पोलिस दल आणी आरोग्य विभागांना या निर्णयातुन वगळन्यात यावे.ज्याप्रमाणे पाच दिवसाचा आठवडा,शासकीय सुट्या यातुन पोलिसांना वगळन्यात येते त्याचप्रमाणे पगार कपातीच्या निर्णयातुनही पोलिसांना का वगळू नये असा प्रश्नही फुलचंद भगत यांनी ऊपस्थीत केला आहे.आरोग्य विभाग व पोलिस दल आपला जीव धोक्यात घालुन सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपले कर्तव्य बजावत असल्याने शासनाने या बाबीचा संवेदनशिलतेच्या दृष्टीकोनातुन विचार करुन या विभागाच्या पगार कपातीचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंतीही सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

शहरात शिधा पत्रीका नसलेल्याची माहिती शासनास देवून सहकार्य करा : डॉ. खाजा खान


परभणी : प्रतिनिधी 
कोरोनाशी लढा देण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले शासनाच्या वतीने गोर गरीबांना अन्न धान्य वाटप करण्यात येणार आहे परंतू ज्याच्याकडे शिधापत्रीका ़आहेत अशांनाच धान्य वाटप केले जाईल असे प्रशासनाच्या वतीने बोलले जात आहे.  शहरातील मानव जागृती बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने किती नागरीकाकडे शिधापत्रीका नाही याचा सर्वेक्षण करण्यात आले. 
शासनाच्या वतीने किराणा, गहु, तांदुळ, दाळ आदी खाद्य पदार्थ वाटप कऱण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.  संस्थेच्या वतीने आज ३१ मार्च रोजी जमजम कॉलनीत सर्वे कऱण्यात आला. यात शंभरच्या वरील नागरीकाकडे  शिधापत्रीका नसल्याचे दिसून आले. सदरील सर्वेसाठी नागरिक सहकार्य करत नव्हते त्यांच्यात एन.आर.सी. ची भीती असून त्यांनी आधारकार्ड व इतर माहीती देण्यास टाळले. या परिसराकडे राजकीय नेत्यानी लक्ष देवून सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहरातील सर्व नगरसेवकांना  डॉ. खाजा खान यांनी विनंती केली की वार्डातील लोकांची माहीती घेवून शासनास देवून सहकार्य करावे. शासनाला मानव जागृतीच्या वतीने विनंती करण्यात आली ज्यांच्याकडे शिधापत्रीका (राशन कार्ड) नाही या गोर गरीबांना अन्न धान्य वाटप करण्यात यावे.  ़यावेळी  डॉ. खाजा खान यांनी दिली सदरील सर्वेक्षणासाठी  अ‍ॅड. सय्यद उबेद  हसन ,मोईन खान, आदींनी परिश्रम घेतले.

पत्रकार खंडेलवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी सेनगावात निषेध


सेनगाव:पत्रकार कन्हैया खंडेलवाल याना हिगोली येथे वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीचा सेनगाव तालुका पत्रकार संघाचा वतीने निषेध करण्यात आला.या संबंधी  सेनगाव तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की हिगोली येथील वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचानी आपले कर्तव्य बजावत असलेले पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना विनाकारण संघटित पणे बेदम मारहाण केली असून खोटा मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी,पत्रकार खंडेलवाल यांच्यावर दाखल गुन्हा तातडीने रद्द करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख,तालुका अध्यक्ष शिवाजी देशमुख,बबन सुतार,विश्वनाथ देशमुख,जगन्नाथ वाढेकर,केशव भालेराव,विठ्ठल देशमुख,गजानन वाणी ,नामदेव मुंडे ,दिलीप कावरखे,संतोष देशमुख,के.के.ठाकूर आदी ची नावे आहेत.

Monday, 30 March 2020

शिरला ग्रामपंचायत कोरोना वायरस मुळे अॅक्शन मोड वर
लोकहितासाठी ग्रामपंचायत सरसावली

फुलचंद भगत
अकोला/पातुर - कोरोना वायरस रोगाचा  प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शिरला ग्रामपंचायत आक्शन मोड वर दिसत आहे,शिरला ग्रामपंचायत मध्ये पातुर शहरातील मोठा भाग येत असून या मुळे प्रश्ण निर्माण झाला होता, कारण पातुर मधील मोठ्या प्रमाणात तरुण युवक पुणे मुंबई सारख्या भागात रोजगार साठी गेले होते, कोरोना मुळे  बाहेरगावातून नागरिक शिरला जिरायत व बागायत, व शिरला भागात परत आल्या मुळे तेथील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते, परंतु शिरला ग्रामपंचायतचे ग्राम सेवक राहुल उन्द्रे यांनी संपुर्ण शिरला ग्रामपंचायत पिंजून काढली, ग्रामपंचायत भागात येणाऱ्या घरी परत आलेल्या लोकांना टेस्ट साठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी मार्गदर्शन करून समज देत आहेत, 
 शिरला परिसर व शिरला बाहेरील जीराइत व बागायत व इतर भागात कोरोना वायरस आजार पसरू नये म्हणून ग्राम पंचायतच्या वतीने ट्रक्टर द्वारा सेनिटायजर व ब्लिचिंग पावडरची जंतू नाशक फवारणी करण्यात येत आहे, ग्रामसेवक तथा त्यांची टीम लोकांच्या घरी जाऊन कोरोना बाबत माहिती देत आहेत.ग्रामसेवक राहुल उन्द्रे सोबत, प्रमोद ऊगले,पोलिस कन्स्टेबल राऊत साहेब,सदस्य चरण, शिरला ग्राम पंचायत  सरपंच रीनाताई संजय सिरसाट, योगेश तायडे,निर्भय पोहरे ,इतर कर्मचारी सोबत फिरून मार्गदर्शन करीत आहेत, विशेष म्हणजे ग्राम सेवक राहुल उन्द्रे यांना महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते नुकतेच सम्मानित करण्यात आले आहे,आणि त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कडून एकूण 28 सम्मान चिन्ह प्राप्त झाले आहेत, अश्या आक्शन मोड ग्राम सेवकाला बघून लोकांन मध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि विशेष म्हणजे नागरिक त्यांच्या आव्हानाला साथ देत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

तंत्रस्नेही शिक्षकांचा कोरोनाविरुद्ध यलगार


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी "आम्ही तंत्रस्नेही शिक्षक" समूहाने चाचणी निर्मिती करून चाचणी सोडविल्यानंतर ऑटोमेटीक प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी सुरज कुदळे (नाशिक), भालचंद्र भोळे (ठाणे) यांचे मोलाचे  सहकार्य मिळाले असून विशाल पाटील (नंदुरबार) व श्यामसुरेश गिरी (लातूर) यांनी प्रश्ननिर्मिती करून चाचणी समिती सदस्यांकडून प्रश्नांची व अचूक उत्तरांची योग्य तपासणी करून चाचणीही घेण्यात आली आहे. ऑटोमेटीक प्रमाणपत्रांना मर्यादा असल्यामुळे दोनशे जणांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व कोरोना जनजागृतीसाठी लिंक १४ एप्रिल २०२० पर्यंत खुली ठेवण्यात आली आहे. 
सदर उपक्रमासाठी प्रकाश चर्‍हाटे व वीणा सोनावणे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे समुहाच्या प्रमुख व मुख्य प्रशासिका वृषाली खाड्ये सांगतात. 
लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात व शैक्षणिक उपक्रमात गुंतवून ठेवण्यासाठी समुहाचे प्रशासक व सदस्यांनी इयत्ता व विषयनिहाय पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा चाचण्या तयार कराव्यात असे आवाहन वृषाली खाड्ये यांनी केले होते. त्यांनी स्वतःही पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी चाचण्या बनवल्या आहेत. जयराम चव्हाण (नाशिक), राजेश चायंदे (अमरावती) या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.

गजानन पुंडे (बुलढाणा), श्यामसुरेश गिरी (लातूर), संदीप सोनार (जळगाव), विशाल पाटील (नंदुरबार), सुनीलकुमार बडगुजर (जळगाव), सुनिता अनभुले (मुंबई), साईली  राणे (मुंबई), ज्योती दुर्गे (पुणे), प्रकाश जाधव (लांजा), कौसर खान (मुंबई), ए.आर. गिरी (भंडारा), इला मिस्त्री (मुंबई), राजकुमार महादेव केदार, अंजली ठाकुर (यवतमाळ), गोरखनाथ वंजारी (भंडारा), ज्ञानेश्वर नामदेव पाटील (नंदुरबार), सतीश दुवावार (चंद्रपूर), कमलेश चर्डे (यवतमाळ) यांनी ऑनलाईन चाचण्या तयार केलेल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खूपच फायदा होत आहे.

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे याचे मुख्यमंत्र्यांना साकडे कोरोना आपत्ती निवारणार्थ आमदार निधी खर्चकरण्याची परवानगी द्यावीआरूणा शर्मा
पालम गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जवळपास ०४ लाख मतदारांच्या सुरक्षितेसाठी उद्भवलेल्या कोरोना आपत्ती निवारणासाठी स्थानिक आमदार विकास निधी २०२०-२१ मधून खर्च करण्याची परवानगी द्यावी यासाठी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदरच तातडीने उपाययोजना करण्यासाठी निधी खर्च करण्याची मागणी आमदार डॉ गुट्टे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या निमित्ताने केली आहे.
सोमवारी दि ३० मार्च रोजी गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष फोनद्वारे चर्चा करीत तसेच ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील उद्भवलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावास रोखण्यासाठी तसेच लॉकडाऊनमुळे येथील जनतेला अत्यावश्यक सर्व बाबी पुरविण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीची तातडीने खर्च करणे आवश्यक असल्याची गरज व्यक्त केली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा सुमारे ०३ लक्ष ८८ हजार ६६२ मतदारांचा मोठा मतदारसंघ आहे. यापैकी सुमारे ०२ लक्ष ७५ हजार नागरिक हे ऊसतोडीसाठी तसे वीटभट्टी,बांधकाम मजूर म्हणून देश व राज्याच्या विविध भागात उदरनिर्वाहा साठी दरवर्षी जात असतात.अशा सर्व ऊसतोड कामगारांच्या तसेच प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी व लॉकडाऊन मुळे उद्भवलेल्या सर्व समस्यांंवर तात्काळ मात करण्यासाठी तसेच संबंधित कामगारांची उपासमार टाळण्यासाठी, अन्नधान्य खरेदीसाठी, अत्यावश्यक गरजा व औषधी खरेदीसाठी आमदार निधीतून मोठ्या प्रमाणात खर्च करणे अत्यंत गरजेचे आहे.जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदरच नागरिकांना सुरक्षितता मिळणार आहे असेही आमदार डॉ गुट्टे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून कोरोना आपत्ती व्यवस्थापन सुक्ष्मपणे राबविण्याची नितांत गरज असून या समितीमार्फत अत्यंत गरीब अन्नसुरक्षा मध्ये असलेले नागरिक, अल्पभूधारक नागरिक,शेतमजूर यांच्यासाठी अन्नधान्य व औषधी वाटप करण्यासाठी खर्च करण्यात यावा ज्यामुळे माझ्या मतदारसंघातील मजुरांवर उपासमारीची वेळ येणार नाही तसेच लॉकडाऊनला तडा जाणार नाही,त्याचे उद्दिष्टही साध्य करता येईल म्हणून आमदार निधीचा गावस्तरावर गरजू लोकांसाठी वापर करण्याची परवानगी देण्यात यावी असे साकडेच आमदार डॉ गुट्टे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे घातले आहेे.

पुढील पाच वर्षांसाठीवीज दरात भरघोस कपात राज्य नियामक आयोगाची घोषणा


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई, : महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज ही कपात  जाहीर केली.  
गेल्या 10- 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळण्यास प्रोत्साहन मिळेल असे श्री. कुलकर्णी यांनी याबाबतची घोषणा करतांना सांगितले.     
केंद्र शासनाच्या विद्युत कायदा 2003 नुसार हा आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त श्री. मुकेश खुल्लर आणि श्री. इक्बाल बोहरी हे सदस्य आहेत. आयोगाचा दराबद्दलचे निर्णय सर्व वीज निर्मिती, वीज पारेषण व वीज वितरण यांना बंधनकारक असतात.   
आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेकरिताचे दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत तर शेतीसाठीचे वीज दर 1 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठया भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
या दरांची निश्चिती करताना सर्व संबंधितांशी प्रदीर्घ चर्चा करून आणि तपशिलवार अभ्यासाअंती आयोगाने हा निर्णय घेतल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. या दर कपातीमुळे उद्योग- व्यवसाय यांना मोठा दिलासा मिळेल, ते पुन्हा नव्याने उभारी घेण्यास सज्ज होतील, अशी आशा व्यक्त करून श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की, ही दर कपात केवळ पुढच्या वर्षापुरती लागू राहणार नाही तर आयोगाने अशा प्रकारे इनबिल्ट पद्धत तयार केली आहे की त्यानुसार ते दर येत्या 5 वर्षापर्यंत लागू राहतील. या निर्णयामुळे शासनाला कोणताही आर्थिक भार पडणार नाही. वीज वितरण कंपन्या अधिक व्यावसायिक पद्धतीने चालवून कमी दरामध्ये ग्राहकांना वीज पुरवण्यास सक्षम असतील. तथपि वीज दरात कपात झाली आहे, म्हणून ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर न करता गरजेपुरता वापर करावा, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा याबाबतचा संपूर्ण निर्णय www.merc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बुलडाणा कोरोना अलर्टआज दि. ३०.३.२०२० रोजी नवीन निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले नागरिक : ०६

बुलडाणा :- 30
- घरामध्ये आज स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (Home Quarntaine) असलेले एकूण नागरिक  : ४६
- काल दि. २९.३.२०२० पर्यंत घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली असलेले नागरिक  : ४०
- आज दि. ३०.३.२०२० रोजी नवीन निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले नागरिक : ०६
- घरात स्वतंत्र खोलीत निरीक्षणात १४ दिवस पूर्ण केलेले नागरिक जे आज ३०.३.२०२० रोजी निरिक्षणातून मुक्त करण्यात आलेले : निरंक
- आजपर्यंत निरिक्षणातून मुक्त करण्यात आलेले एकूण नागरिक : २६
- अशाप्रकारे घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली असलेले नागरिक : ४६
- स्त्री रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेले नागरिक : ६८
- स्त्री रुग्णालयातून निरिक्षणातून आजपर्यंत मुक्त करण्यात आलेले एकूण नागरिक: ०९
- संशयीत म्हणून जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात आज दाखल असलेले नागरिक : ०८ (खामगाव -३) (बुलडाणा-५)
- नागपूर प्रयोगशाळेत आज पर्यंत swab पाठविलेले नमुने : ४९
- नागपूर प्रयोगशाळेतून आजपर्यंत प्राप्त रिपोर्ट: १५
- नागपूर येथून आज प्राप्त रिपोर्ट : ०१ (निगेटिव्ह)
- प्रलंबित रिपोर्ट : ३४
- आयसोलेशन कक्षातून रिपोर्ट नंतर सुट्टी देण्यात आलेले नागरिक : ०८
- सध्या आयसोलेशन कक्षात दाखल असलेले नागरिक : ०८
     - ही माहिती अति. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

जमील पठाण
8805381333

रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही.


अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा
बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई,:-  रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म  उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे.  सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

सावधान...'एप्रील फुल' करुन अफवा पसरुन परिस्थीती बिघडन्याची शक्यता
प्रशासनाने लक्ष ठेवन्याची गरज

सोशल मिडियाचा जपुन वापर करा

वाशिम(फुलचंद भगत)-येणार्‍या १ एप्रीलला बरेचसे लोक आपल्या मिञमंडळीला,हितसबंधिंना,नातेवाईकांना एप्रील फुल करत असतात त्यातुन एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो परंतु सध्यास्थीतीत आपल्यावर कोरोनाव्हायरसचे संकट तसेच संचारबंदी यामुळे आपण कोरोनाव्हापरसच्या संदर्भाने अफवा पसरु शकतात. कोणत्याही प्रकारच्या लोकांच्यामध्ये सभ्रम निर्माण करतील अशा प्रकारचे मॅसेज विविध व्हाट्सअप गृपवर,फेसबुकवर आणी इतर समाज माध्यमावर येन्याची शक्यता नाकारता येत नाहीत त्यामुळे असे अफवा पसरवणारे किंवा खोटे मॅसेज पाठवुन परिस्थीती बिघडविल्यास सबंधितांवर योग्य कारदेशशीर कारवाई करावी तसेच या एप्रिल फुल संदर्भात प्रशासनाकडुन आदेश पारित करुन लोकांना सजग राहन्याच्या सुचना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणी पञकार फुलचंद भगत यांनी प्रसिध्दीपञकाव्दारे प्रशासनाकडे केली आहे.आपल्या जिल्ह्यात संचारबंदिचे कुठेही ऊल्लंघन होवू नये सर्वांनी सजग राहुन घरातच राहावे आणी सोशल मिडियाचा योग्य वापर करावा,अफवा पसरवु नये आणी अफवा पसरु देवू नये ही सर्वांची जबाबदारी आहे.सायबर सेलने या बाबीकडे लक्ष द्यावे तसेच या प्रकरणी शासनाने स्वतंञ आदेश पारित करावे जेणेकडुन एक एप्रिलला अफवा पसरन्यास पायबंद बसेल .सोशल मिडियाचा लोकहितासाठी,सामाजिक कार्यासाठी करावा व सोशल मिडियाचा जपुन वापर करावा असे मतही फुलचंद भगत यांनी मांडले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

परळीचे नायब तहसीलदार रुपनर यांच्यामुळे आठ दिवस उपाशी कुटुंबाला मिळाले अन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संपूर्ण भारतात चालू असलेल्या लाॅकडाऊन मुळे लाखो मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील नाथरा गावाजवळ राजस्थान राज्यातील दोन कुटुंब उपाशी पोटी असल्याची माहिती नायब तहसीलदार रुपनर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सुञे.हलवून त्यांच्या अन्न पाण्याची सोय केली. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडले. 
    या कुटुंबाची माहिती तलाठी गिते मॅडम यांनी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना दिली. त्यांनी लगेच नाथरा गावचे चेअरमन अतुल मुंडे यांना दिली. अतुल मुंडे यांनी यांचं कुटुंबातील सर्वाची अन्न धान्याची व्यवस्था केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा जबाबदारीचा ताण असतानादेखील माणुसकीच्या भावनेतून काम करणारे रुपनर, अतुल मुंडे, व तलाठी गिते मॅडम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट... अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासामुंबई (प्रतिनिधी) दि.३० मार्च :-  रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मिडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म  उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे.  सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

साखरा येथे प्रशासनाच्या उपाययोजनेची अमलबजावनी


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

साखरा येथे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्ती मध्ये किमान एक मीटर अंतर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे या पार्श्वभूमीवर किराणा दुकान मेडिकल समोर चौकोनी रिंगण आखण्यात आले आहेत या रिंगणात किराणा मेडिकल घेण्यासाठी उभे राहण्यास सांगितले जात आहे किराणा दुकान चि वेळ देखील देण्यात आली आहे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत किराणा चालू राहत आहेत त्यानंतर पूर्ण दुकाने बंद होत आहेत
j

तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वहिनी

एका दाण्याचे हजार दाणे करणाराच भूकबळीचा शिकार


रयत क्रांती संघटना युवती प्रदेश अध्यक्ष  प्रिया लोडम

वाशिम(फुलचंद भगत)-जगात सर्वत्र कोरोनाची महामारी असतांना, हाताला काम नाही हेच आम्हाला माहीत आहे, काम नाही तर संध्याकाळची चूल पेटणार नाही, या कारणांमुळे शहरातील कामगार, मिळेल ते काम करणारे मजूरवर्ग,व मोलकरणीचे काम करणाऱ्या खेड्यातील माय बहिणी पोटाच्या खंडणी भरण्याकरिता शहरात गेल्या होत्या, परन्तु अचानक शहर बंद झाल्यामुळे,ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील शेतकरी शेतमजूरांचे लोंढेच्या लोंढे शहरातून खेड्यात निघत आहेत, यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक भूकबळीचा फटका हा ग्रामीण भागातील जनतेलाच बसणार,कारण शहरे अचानक बंद झाले हेही मजूरांना माहीत नाही हा कामगार वर्ग मजुरवर्ग जेथे जेथे काम करीत होता तो कारखाना ते कार्यालय व मोलकरणीचे काम करण्याचे शहरातील हवेली अचानक बंद दिसल्या व हातावर पोट भरणाऱ्या, फुटपाथवर, राहणारा मजूर विचारात पडला,आता शहरात काम नाही म्हणून मजूर वर्ग गावाला जवळ करावे म्हणून बस स्थानक व रेल्वे स्टेशन वर निघाला तर सर्व मार्ग बंद झाले आहे हे माहीत होताच मजूर वर्ग विवंचनेत पडला व कडेला मुलबाळ घेऊन गावाकडे पैदल निघाला आणि इंडिया बंद असल्याने भारतीय मजुरांना रस्त्याने पोलिसांचा मार सुद्धा खावा लागत आहे, स्वातंत्र्य काळानंतर ही सरकारे शेतकऱ्यांची लूट करीत होते, म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांना कामाच्या शोधात शहरात जावे लागले आणि तोच एका दाण्याचे हजार दाणे करणारा ग्रामीण भागातील शेतकरी आजच्या बंद काळात सुध्दा सर्व जगाला धान्य ,भाजीपाला,दुध फळं पुरवठा करीत आहे परन्तु त्यांच्याच नशिबी भूकबळी होण्याची वेळ आली आहे,उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश येथील मजुर वर्ग दिल्लीत कामाला गेला होता हाताला काम नाही राहायला घर नाही ,आपले गावं किती लांब आहे हे माहीत असताना सुध्दा पैदल मार्गाने मुलाबाळांसह निघाला आहे आज त्यांना उपाशीपोटी व पाण्याविना निघावे लागले आहे ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे ,प्रत्येक राज्यातील सरकारने ही माहिती हातावर पोट भरणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला किमान आठ दिवस पहिले द्यायला पाहिजे होती जेणेकरून ही धांदल उडाली नसती आणि आता याचं जनतेची भूकबळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, टीव्हीवर हिरोईन भांडे घासताना दाखवून ,एखादा मंत्री टीव्हीवर रामायण रामायण पाहतांना दाखवून हा प्रश्न सुटणार नाही, हे गंभीरपणे विचार करून त्या त्या राज्यातील सरकारने पैदल मार्गाने जाणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला गावापर्यंत पोहचविण्यासाठी मार्ग काढावा अशी विनंती रयत क्रांती संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा प्रिया लोडम यांनी प्रशासनाकडे प्रसिध्दीपञकाव्दारे विनंती केली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

ध्यासच्या मंचावरून कविता जिंकली कोरोना हरला


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजवला असताना भारतातही त्याचे पडसाद उमटले. शासकीय, राजकीय कार्यक्रमांसह विविध खेळांच्या स्पर्धा, शालेय महाविद्यालयीन परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, सिनेमा यांच्यासह साहित्यिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनेक नियोजित कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले किंवा रद्द करण्यात आले. असंच एक कवीसंमेलन आणि सादरीकरण स्पर्धेचा कार्यक्रम ध्यास कवितेचा काव्य मंच, मुंबई यांच्या वर्धापदिना निमित्ताने बोरिवली येथील सायली इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रसिध्द गझलकार प्रशांत वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात पार पडणार होता. परंतू शासकीय यंत्रणाना सहकार्य करतानाच आपल्या साहित्यिकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, यासाठी आयोजकांनी संमेलन नियोजित ठिकाणी होणार नाही, असे सर्व सादरकर्त्यांना कळवले. 
पण कविता जिंकली पाहिजे हीच भावना सर्वांच्या मनात होती. त्या अनुषंगाने ऑनलाईन काव्य स्पर्धा घ्यायचे ठरले आणि ६८ स्पर्धकांकडून ध्वनिमुद्रीकरणाच्या माध्यमातून कविता मागवण्यात आल्या. त्याला प्रतिसाद देत ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि येथेच कविता जिंकली. या स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत प्रशांत वैद्य सरांनी ६ अंतिम विजयी क्रमांक जाहीर केले. यात प्रथम क्रमांक पंकज जावळेकर, द्वितिय डॉ. सुजाता मराठे, तृतिय प्रदीप बडदे आणि उत्तेजनार्थ प. सा. म्हात्रे, कुसुम बागले, नमिता आफळे सरस ठरले.
सर्व विजेत्यांना अमृताई फाऊंडेशन (नियोजित) रोझोदा. ता. रावेर यांच्या वतीने समारंभपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. 
"सर्व प्रथम मी ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबईच्या सर्व संघाचे अभिनंदन करतो...! मराठी कवितेचा संस्थेने घेतलेला हा ध्यास खरोखरंच कौतुकास्पद आहे...! ध्यासचं अजून एका निर्णयाबद्दल कौतुक की "कोरोना विरुध्द कविता" यात कविताच सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून ध्यासने कविता स्पर्धा ऑनलाईन घेतली...! खरंच यासाठी त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे...!" अशा शब्दांत प्रसिध्द गझलकार प्रशांत वैद्य यांनी ध्यासच्या कार्याचा सन्मान केला. 
ध्यासचं ब्रीददवाक्य "कविता जगणाऱ्या प्रत्येकासाठी" असं आहे आम्ही कविता जगतो आणि इतरांना सुध्दा जगायला लावतो. आज कविता आणि कोरोनाच्या युध्दात कविता जिंकली आहे याचा सार्थ अभिमान वाटतो असे ध्यासचे अध्यक्ष संदेश भोईर यांनी सांगितले. तसेच घरी रहा सुरक्षित राहा असा संदेश ध्यासचे सचिव राजेंद्र चौधरी यांनी दिला या ऑनलाईन कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी ध्यासचे प्रसिध्दी प्रचार प्रमुख गुरुदत्त वाकदेकर यांनी घेऊन लिलया पार पाडली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ध्यासच्या महिला संपर्क प्रमुख रजनी निकाळजे, ध्यासचे सदस्य संतोष मोहिते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

साखरा येथे प्रशासनाच्या उपाययोजनेचे अमलबजावनी


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

साखरा येथे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्ती मध्ये किमान एक मीटर अंतर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे या पार्श्वभूमीवर किराणा दुकान मेडिकल समोर चौकोनी रिंगण आखण्यात आले आहेत या रिंगणात किराणा मेडिकल घेण्यासाठी उभे राहण्यास सांगितले जात आहे किराणा दुकान चि वेळ देखील देण्यात आली आहे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत किराणा चालू राहत आहेत त्यानंतर पूर्ण दुकाने बंद होत आहेत


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वहिनी

कोरोनाच्या पार्श्वभूमीतही डॉ. राजाराम मुंडे यांची आरोग्य सेवा 24 तास सुरू
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळीत डाॅ.राजाराम मुंडे यांनी कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीत सुध्दा स्वतःची काळजी घेऊन रुग्णांची सेवा*श रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा डाॅ. राजारामजी मुंडे   स्वःताची काळजी घेऊन स्वःताहा पेसेंन्टची काळजी करतांना आज कार्य करीत आहेत. डाॅ. म्हणजे डाॅ.  राजारामजी मुंडे साहेब एवढे मोठे देशावर कोरोनाचे संकट असतांना सुध्दा ते त्याचं कार्य करत आहेत सर्व सामान्यांना सेवा देतात ते म्हणतात कोरोनाला घाबरून जाऊ नका आपण घरातच थांबा तो कोरोना आपोआप जाईल आणि पंतप्रधान मोदी पण सांगतात बाबांनो घरी थांबा डाॅ. राजाराम मुंडे हे पण आलेल्या रूग्णांना तळमळीने व हात जोडून सांगत आहेत कि फिरूनका तुम्ही तुमच्या घरातच थांबा व पेसेंन्टला घाबरून जाऊ नका घरातच आराम करा धीर देऊन पेसेंन्टला घरी पाठवत आहेत डाॅ. राजाराम मुंडे साहेब स्वःताची काळजी घेऊन ईतरांना देखील मोलाचे मार्गदर्शन ते करत आहेत अश्या  या परिस्थितीत लोक भयभित झालेले आसुन त्यांना चांगल्या सल्याची गरज महत्त्वाची आस्ते आशा वेळी पेसेंन्टला मार्गदर्शनाची गरज अश्या  आवस्थेत माणुस घाबरलेला आस्तो त्याला साधी सर्दी किंवा ताप आला की माणुस घाबरतो अश्या वेळी आपला माणुस म्हणजे जवळचा डाॅ. सर्वांना आपलस करून घेणारे सर्वांना प्रेमाणे बोलणारे अश्या वेळी धीर देणारे डाॅ. म्हणजे डाॅ. राजाराजी मुंडे साहेब देव माणुस त्यांना  वंदन मि करतो सध्या पोलीस बांधव, डाॅक्टर,नर्स, समाज सेवक,व आमचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब हे देखिल जनतेची काळजी व गोरगरिबांना मदत देत आहेत अंध, अपंग,रोडवर फिरणारे,मंदिर, बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणाच्या लोकांना देखील न्या मंञी व बीड जिल्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब  यांनी राहाण्याची व भोजनाची सोय केलेली आहे खरोखरच साहेबांनी आज  धनंजय मुंडे साहेब  गोर गरीबांचे दिन दुबळ्यांचे मायबाप म्हणजे धनंजयजी मुंडे साहेब रोज मंजुरी करून खानारा माणुस आज उपाशी झोपू लागलेला पाहुन मुंडे साहेबांनी  एक तात्काळ निर्णय घेऊन सर्वांना भोजनाची व राहण्याची सोय साहेबांनी केलेली आहे. ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे अ.भा.वारकरी मंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष यांनी त्यांच्या या आरोग्य सेवेच्या कार्याचे कौतुक केले आहे.

जिल्हाधिकारी बीड श्री. राहुल रेखावार यांचे पत्रकार आणि जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


 आपल्या जिल्ह्यात प्रवेश केलेल्या कोणत्याही व्यक्तीची आणि  ज्या मार्गाने जिल्ह्यात बाहेरून येतात, अशा मार्गांची माहिती प्रशासनात कळवा अशी सर्व पत्रकारांना विनंती आहे.  
     तसेच जिल्ह्यातील ग्रामस्थांना जागरूक करणे गरजेचे असून कोणत्याही नागरिकाच्या अशी बाब निदर्शनास आल्यास  त्यांनी अधिकाऱ्यांना सांगण्यास प्रोत्साहित करा. जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या लोकांना  स्वतंत्र ठिकाणी 14 दिवस विलगीकरण करणे  आवश्यक आहे.   त्यांना जिल्ह्यातील कोणत्याही गावात खेड्यात राहण्याची परवानगी नाही. हे खूप महत्वाचे आहे.

बँकांच्या ग्राहक सेवा केंद्र वरील सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नाही-जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड, (प्रतिनिधी) :- दि.29-  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळण्याकरिता ग्राहकांनी भारतीय स्टेट बँकेने व महाराष्ट्र ग्रामिण बँक या बँकांनी उपलब्ध करून दिलेल्या ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा. या ग्राहक सेवा केंद्रांवरील सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहकांनी या केंद्राचा वापर केल्यास त्यांना  प्रवास करावा लागणार नाही व त्यांचे काम सोईचे होईल असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे.
या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर दि.24 मार्च 2020 पासून जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू केलेले आहे.  संचारबंदीच्या सुधारीत आदेशानुसार  14 एप्रिल 2020 रोजीपर्यंत बँकांची वेळ देखील सकाळी 7 ते 9.30 वाजेपर्यत करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत आर्थिक वर्षाचा शेवट मार्च अखेर असल्याने बँकांमध्ये संभाव्य होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे.
यामुळे तीन प्रकारच्या सेवा भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र प्रामिण बँक तर्फे ग्राहक सेवा केंद्रांवर पुरविल्या जाणार असल्यामुळे, या सेवा बँकांच्या शाखांमध्ये 14 एप्रिल 2020 रोजीपर्यंत पुरविल्या जाणार नाहीत. महाराष्ट्र ग्रामिण बँकेतर्फे गांव निहाय व दिवस निहाय ग्राहक सेवा केंद्राचे वेळ बँकेकडून घोषित करण्यात येईल.  
जिल्ह्यामध्ये आज रोजी भारतीय स्टेट बँकेचे 305  सेवा केंद्र (CST) कार्यरत असून या केंद्रा मार्फत 10 हजार रुपये पर्यंत पैसे काढणे, 20 हजार रुपये पर्यंत पैसे भरणे, 20 हजार रुपये पर्यत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरणे या सेवा पुरविण्यात येतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या अंदाजित 200 ग्राहक सेवा केंद्र (CSP) असून या ग्राहक सेवा केंद्रामार्फत 20 हजार रुपये पर्यंत पैसे काढणे, 20 हजार रुपये पर्यंत पैसे भरणे व 50 हजार रुपये पर्यंत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरणे या सेवा पुरविण्यात येतात.

राज्यातील सर्व शाळांतील वर्ग सुरू होईपर्यंत पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये - वर्षा गायकवाडमुंबई (प्रतिनिधी) :-  महाराष्ट्र सरकारकडून  राज्यातील सर्व शाळांना वर्ग सुरू होईपर्यंत शालेय शुल्क  न घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देशभरातील लॉकडाऊन संपेपर्यंत शाळांनी पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे निर्देश दिले आहे. हरियाणा सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात हरियाणा स्कूल बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई किंवा इतर कोणत्याही मंडळाशी संबंधित सर्व खासगी शाळांना वर्ग पुन्हा सुरू होईपर्यंत शालेय फी न घेण्यास सांगितले आहे. लॉकडाऊन काळात देशातील अनेक शाळांनी पालकांना फी शुल्क भरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉकडाऊन काळात पालकांकडून फी न आकारण्याचे निर्देश दिले आहेत.

वाशिम जिल्ह्यात ईलेक्टीकची आणी आॅटोमोबाईलची दुकाने सुरु ठेवन्याची मागणीदैनदिन व्यवहारात येणार्‍या अडचणीचा प्रशासनाने विचार करावा

वाशिम-(फुलचंद भगत)जिल्ह्यातील जनतेचा विचार करता इकेट्रिक व आॅटोमोबाईलची दुकाने टप्प्याटप्प्याने वेळा ठरवुन सुरु ठेवाव्यात जेणेकरुन लोकांच्या यासंदर्भातील समस्या दुर होतील अशी मागणी जनतेमधुन होत आहे.
            कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागु आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानेही बंद करन्यात आली आहेत.कोरोनाचा प्रार्दुभाव होवु नये या अनुषंगाने प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नही करत आहे.परंतु घराघरात इलेट्रीकचे ऊपकरणे आहेत तसेच यासंदर्भातील दुरुस्तीही करणे जरुरीचे असते सोबतच अत्यावश्यक सेवेसाठी वाहने ही तयार असणे गरजेचे असते परंतु ती जर नादुरुस्त असली तर रूग्नांना ताबडतोब दवाखान्यात नेता येणार नाही या अनुषंगाने आॅटोमोबाईल्सची दुकाने,स्पेअरपार्ट सबंधीची दुकाने,ईलेट्रिक मेंटनस,स्पेअरपार्ट व दुरुस्ती सबंधीत दुकाने टप्याने व वेळा ठरवुन लोकांची गर्दी होणार नाही याचा प्रयत्न करुन सुरु करावीत जेणेकरुन याबाबतीतल्या समस्या उद्भवणार नाहीत असे आदेश शासनस्तरावरुन निर्गमित करावेत अशी मागणी जनतेमधुन होत आहे.

फुलचंद भगत
मगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835