तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांवर सिरसाळा येथे हल्ला ; दोन पोलिस जखमी 10 जणांच्या विरोधा गुन्हापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कोरोना आजार पसरू नये यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. देशात आणि राज्यात संपूर्णत: संचारबंदी करण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आलेला आहे. नागरीकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरच तालुक्यातील सिरसाळा येथे काही जणांनी हल्ला केल्याची घटना बुधवार, दि.२५ मार्च रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, 10 आरोपींच्या विरोधात सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सिरसाळा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे पालन होते आह की नाही? यासाठी पोलिसांकडून पेट्रोलींग करण्यात येत आहे. मोटारसायकलवरून पेट्रोलींग करणाऱ्या दोन पोलिसांवर बुधवारी हल्ला करण्यात आला. पोलिस नाईक किशोर कचरू घटमल (वय३३) वर्षे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांत आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किशोर घटमल व पोलिस नाईक जेटेवाड हे दुपारी ४ च्या सुमारास गावातील वडार गल्ली येथे पेट्रालींगसाठी गेले होते. त्या ठिकाणी काही महिला व पुरूष एका ठिकाणी जमले असल्याचे पाहून त्यांना समज देण्यासाठी तेथे गेले व त्यांना संचारबंदी असल्याचे सांगितले. मात्र जमावातील लोकांनी आमच्या गल्लीत येवून सांगण्याचा तुमचा संबंध काय? असे म्हणत लाकूड व दगड विटांनी त्यांना मारहाण केली. ज्यामध्ये आरोपी राम तुकाराम पवार, श्रीराम बाबु पवार व त्याची तीन मुलं, दत्ता हरिश्चंद्र देवकर, अशोक तुकाराम पवार, विकास अर्जुन मिटकर, विलास अर्जुन मिटकर, सोनाली भ्र.राम पवार, अनिल जाधव, राम तुकाराम पवार व त्यांची पत्नी यांनी हल्ला चढवला. या घटनेत पोलिस नाईक किशोर घटमल व जेटेवाड हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरिक्षक श्रीकांत डोंगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या ९ आरोपींच्या विरोधात भादंवीचे कलम 353, 332, 336, 143, 147, 149, 323, 504, 506, 188 सह कलम 51 (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहीती मिळताच पो.नि.श्रीकांत डोंगरे पाटील, सहा.पो.नि.विघ्ने, पोलिस कर्मचारी परतवाड, कनकावार, यरडलावार, जाधव, गायकवाड यांनी घटनास्थळावर जावून जमावाची पांगवापांगव केली

No comments:

Post a Comment