तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

बीड जिल्ह्यात १२ वाजल्यापासून संचारबंदी लागू आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यात कर्फ्यु-जिल्हाधिकारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; रोज सकाळी 11 ते 3 संचारबंदी शिथील शिथील काळात पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित आल्यास कारवाई, संचारबंदी पाळण्याचे आवाहन


बीड (प्रतिनिधी) :-  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने आज कठोर पावले उचलली. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकार परिषद घेवून आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून 31 मार्च पर्यंत बीड जिल्ह्यात संचारबंदी (कर्फ्यु) लागु करण्यात आला असून या काळामध्ये कुठलाही व्यक्ती अनावश्यकपणे रस्त्यावर दिसून आल्यास त्या विरोधात दंडात्मक कारवाईसह कठोर कारवाई करण्यात येईल. रोज सकाळी 11 ते दुपारी 3 कार्यकाळामध्ये संचारबंदी जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथील करण्यात येईल. या काळातच जिल्ह्यातील नागरिकांनी आपले जीवनावश्यक वस्तू खरेदी करावयाच्या आहेत. या शिथील काळातही पाच पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यातल्या 16 सीमा लॉक केल्या असून या भागातून केवळ जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे वाहनच जिल्ह्यामध्ये घेतले जातील. या वाहनामध्ये पाच पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास ते वाहन जिल्ह्याच्या सीमेत घेतले जाणार नाही. असे म्हणत जिल्हाधिकार्‍यांनी लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा कठोर निर्णय घेतला जात असल्याचे सांगून जनतेने काल जसं सहकार्य केले तसे सहकार्य पूढील कार्यकाळात करावे असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment